Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

जनसेवेचा व सामाजिक बांधिलकीचा तेजस्वी चेहरा : सनी अहिवळे

टीम : धैर्य टाईम्स

फलटण शहरातील मंगळवार पेठ म्हटले की समाजहितासाठी सतत झटणारे, लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजणारे, आणि विकासकामांना प्राधान्य देणारे नाव म्हणजे माजी नगरसेवक सनी अहिवळे. आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांनी मंगळवार पेठेतील नागरिकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. सोमवार दिनांक १० नोव्हेंबर त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न.


विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विचार व आचारांवर सनी अहिवळे यांनी कायमच श्रद्धा ठेऊन राजकीय व सामाजिक जीवनात काम केले आहे.


सनी अहिवळे यांनी नगरसेवकपद भूषवताना “सेवा हीच साधना” हे तत्व आचरणात आणले. केवळ राजकारणापुरते मर्यादित न राहता समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक व राजकीय कामात त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुपर्णा वहिनी यांचे मोठे योगदान असते. 


सामाजिक उपक्रमांची मोठी परंपरा


करोना काळात जेव्हा सर्वत्र भीती आणि अंधार होता, तेव्हा सनी अहिवळे हे आशेचा किरण बनले. करोना काळात एक महिना रोज मंगळवार पेठेमध्ये उत्तम दर्जाचे जेवण लोकांना पुरविले. दोन वेळा किराणा किट वाटप करून अनेक कुटुंबांचे पोट भरले. मोफत कोरोना टेस्ट आणि लसीकरण मोहिमा राबवून आरोग्य जनजागृती केली.



आरोग्य क्षेत्रात त्यांनी मोफत डोळे तपासणी शिबिर, चष्मे वाटप, रक्तदान शिबिरे, तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरे व मेळावे आयोजित केले होते. सातत्याने आरोग्य विषयक कार्यक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला आहे. जनतेचे आरोग्यमान सुधारावे यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात 



 शिक्षण क्षेत्रातील योगदान


दरवर्षी शालेय विध्यार्थीना वह्या, दप्तर आणि शालेय वस्तूंचे वाटप करण्यात ते आग्रही असतात. आर्थिक दुर्बल विध्यार्थीना शालेय साहित्य मिळावे तथा त्यांना शालेय जीवनामध्ये आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी सनी अहिवळे सातत्याने सहकार्याची भूमिका ठेवतात.  


10 वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार करुन त्यांना भविष्यात प्रेरणा मिळावी यासाठी सनी दादा प्रयत्नशील असतात. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करुन त्यांना शाबासकीची थाप देतात. 


विद्यार्थ्यांकरिता चित्रकला, निबंध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ते नेहमीच प्रोत्साहन देतात.


मंगळवार पेठेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी स्वच्छता, समाजविकास आणि विविध सुविधा देण्यात सनीदादा नेहमीच आग्रही असतात. वच्छता अभियान, डस्टबिन वाटप असे कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जातात.  


रस्ते, विज, गटार अशा कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे प्रकल्प त्यांनी मंगळवार पेठे मध्ये प्रामुख्याने राबविले आहेत. व्यायामशाळा, वाचनालय, समाजमंदिर, शौचालय आणि प्राथमिक शाळा बांधणी यांमुळे मंगळवार पेठ आज एक आदर्श विभाग म्हणून ओळखला जातो याचे श्रेय सनी अहिवळे यांनाच जाते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. 

 


सनी अहिवळे यांनी नेहमीच दुर्बल घटकांना आधार दिला आहे. अनाथाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृद्धाश्रमात साडी, शाल व फळांचे वाटप, गरजूंना आर्थिक मदत करण्यातही सनीदादा नेहमीच अग्रेसर असतात. महाराष्ट्रातील अतिवृष्टीच्या काळात सांगलीमध्ये पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात सनीदादांचा मोठा वाटा राहिला आहे. प्रतीवर्षी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याला अन्नदान ही त्यांची खरी ओळख आहे.



महिलांसाठी प्रेरणादायी कार्य


दरवर्षी ८ मार्च महिला दिनानिमित्त "आदर्श महिला पुरस्कार" देऊन त्यांनी अनेक महिलांना सामाजिक सहभागासाठी प्रेरित केले आहे.


“राजकारण हे केवळ पदासाठी नाही तर लोकांच्या हितासाठी असावे” — हे सनी अहिवळे यांचे ब्रीदवाक्य आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. 


अशा या लोकसेवकाला, जनतेच्या मनात घर करणाऱ्या माजी नगरसेवक सनी अहिवळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपले सामाजिक कार्य असेच प्रेरणादायी राहो, आणि आपले नेतृत्व लोकांसाठी आशेचा दीप ठरो हीच मंगलमय शुभेच्छा! 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER