फलटण : आसू ता फलटण येथील १३ वर्षीय मुलास जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. या पार्श्वभूमीवर फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील यांनी याच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली व त्यास आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्या सूचना दिल्या जीबीएस विषाणू पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिल्या माजी खासदार रणजितसिंह ना निंबाळकर यांनी ही फोनवरून आधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी आसू गावातील पशुवैधकीय केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच गावातील गटार, सांडपाणी व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे व्यवस्था, स्वच्छता तसेच ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्या कामाची पाहणी केली. ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी,कर्मचारी व पशुवैद्याधिकारी यांचेकडून कामात हलगर्जीपणा होत असल्याचे निदर्शनात आले असता याची गंभीर दखल घेऊन त्यांना कामात कुसूर करू नये व नागरिकांच्या जीवाशी खेळाल तर याद राखा अश्या शब्दात दखल घेऊन त्यांना यापुढे नागरिकांची तक्रारीवर त्वरित निरसन करण्यासंबंधी सूचना केल्या. तसेच जीबीएस आजार पसरू नयेत याबाबत काळजी घेण्याबाबत अधिकारी यांना सूचना दिल्या.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच भाजप तालुका अध्यक्ष बजरंग गावडे,विशाल माने, अमोल लवळे असू गावचे ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.