फलटण : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी यांच्या आदेशा नुसार संपूर्ण महाराष्ट्र २२ फेब्रुवारीला दुपारी १२. १० मिनिटांनी विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील फलटण - सातारा रोड वरील वाठार - निंबाळकर फाटा या ठिकाणी चक्का आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धनंजय महामूलकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
कृषी पंपाची वीज कनेक्शन तोडणी त्वरित थांबवावी, उसाला एक रकमी एफ आर आर निकाली सुदोष कृषी पंपाची वीज बिल दुरुस्ती करून मिळावे, वीजदर नियामक आयोगात सुचवलेली 37% दरवाढ रद्द करावी, शेतीला दिवसा बारा तास लाईट मिळावी, ऊसतोडीसाठी पाच ते दहा हजार रुपये मागणी करणाऱ्या मुकादमावर खंडणीचे गुन्हे दाखल करावेत, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 प्रोत्साहन पर अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावेत आदी मागण्यांकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.