Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन बारा लाख किंमतीचे एकुण ४० मोबाईल मुळ मालकांना परत फलटणमध्ये विविध पदांसाठी रोजगार मेळावा; तरुणांना मोठी संधी फलटणमध्ये फॅन्सी नंबर प्लेट आणि काळ्या काचांच्या गाड्यांचा सुळसुळाट; पोलिस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष फलटण च्या वैभवात भर घालणारे जयश्री गार्डन अँड लॉन्स आजपासून लोकांच्या सेवेत निसर्गाच्या सानिध्यात हिरवाईने नटलेले सुंदर ठिकाण फलटणचे सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे सुपुत्र लखन मोरे यांची भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या कर्णधारपदी निवड वनविभागाच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता फलटण वनविभागाकडून वनसेवा केंद्र स्थापन - वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती निकिता बोटकर फलटण येथे दिनांक ८ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानाचे आयोजन मेंटेनन्स की फसवणूक? जाधववाडीत पहाटेपासून विजेचा लपंडाव; संतप्त नागरिकांचा महावितरणवर संताप मीरा बोरवणकर यांची महिला आयोग अध्यक्षपदी निवड ? सोशल मीडियावरील वृत्तावर सरकारचं स्पष्टीकरण आज मेंटेनन्समुळे शहरातील अनेक भागांत वीजपुरवठा खंडित महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेच्या शाखा फलटणच्या अध्यक्षपदी मुकेश अहिवळे यांची नियुक्ती सौ. वैशाली चोरमले यांचा राज्य शासनाच्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान फलटणमध्ये मटका-चक्रीचा सुळसुळाट; लाखोंच्या हप्त्यांचा खेळ उत्तमराव शेंडे यांच्याकडून सरपंच सागर अभंग यांना शिवीगाळ दमबाजी नाथपंथी समाजाच्या अध्यक्षपदी महादेव शिंदे,कार्याध्यक्षपदी नंदुशेठ शेगर विडणी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती बेकायदेशीर नळ कनेक्शनवर पालिकेचा धडक निर्णय; 27 एप्रिलपर्यंत नियमितीकरणाची मुदत विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया कशी असते, किती असतात सदस्य ? जिद्दी संघर्ष योद्धा - यशवंत खलाटे - पाटील फलटणच्या चक्री मध्ये पोलिसांची आर्थिक चकरी फलटणमध्ये पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध धंदे तेजीत ? फलटणमध्ये विजेचा लपंडाव कायम; वरिष्ठांच्या निर्णयामुळे शहर-उपनगर त्रस्त - सहाय्यक अभियंता बाळू लोंढे यांची माहिती अनधिकृत फ्लेक्सवर पालिकेचा हातोडा विज चोरी प्रकरणी शेळके कन्स्ट्रक्शन कंपनीला तथा त्यांचे अधिकारी विष्णू बबनराव शिंदे यांना महावितरणचा झटका डीजे व फटाकेमुक्त आंबेडकर जयंतीचा आदर्श घ्यावा : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळे  बहुजनांची मुले उच्च पदस्थ झाली - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग श्री जितोबा विद्यालय जिंती येथे माजी विद्यार्थी संघटना स्थापन फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पोलिसांचा रूट मार्च जिंती येथील चिमुकला राघव रणवरे मंथन स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रात दुसरा फलटणच्या मुधोजी हायस्कूलमध्ये आरोग्य, संस्कार व मोबाईलच्या दुष्परिणामांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर विक्रम गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा - ग्राहकांची मागणी धुळदेव यात्रेत ऐतिहासिक बदल : सचिनराव अभंग यांच्या पुढाकाराने उजळली यात्रा, भाविकांना मिळाल्या सुविधा

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त पंढरपूर ते घुमाण रथ व सायकल यात्रेचे फलटण शहरात उत्स्फूर्त स्वागत

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सायकल यात्रींचा सहभाग
टीम : धैर्य टाईम्स

 फलटण:- आज पंढरपूर हुन घुमान(पंजाब)येथे जाणाऱ्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याचे सायंकाळी आगमन झाले यावेळी शिंपी समाजाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

 यावेळी फलटण ना स प चे अध्यक्ष करण भांबुरे, विठ्ठल मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश हेंद्रे, उपाध्यक्ष मृणाल पोरे,महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्मा टाळकुटे, माजी अध्यक्ष महेश हेंद्रे, विजय उंडाळे,मोहन जामदार, ट्रस्ट चे सचिव अविनाश कुमठेकर,श्रीकांत मुळे, शेखर हेंद्रे, राजेंद्र गाठे,महिला मंडळाच्या उपाध्यक्ष सौ अंजली कुमठेकर, खजिनदार अश्विनी हेंद्रे,पत्रकार संजय जामदार,मनीष जामदार,श्रीकांत राजेंद्र पोरे,मंगेश पोरे,राहुल जामदार,योगेश भांबुरे, राजेंद्र कुमठेकर,मिलिंद गाठे,महेश उरणे,यशराज भांबुरे यांच्या सह नामदेव भक्त समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे चरण पादुका रथ व सायकल वारी आल्या नंतर सोहळा प्रमुख सूर्यकांत भिसे यांचे व भाजनकरी बांधवांचे फलटण ना स प चे अध्यक्ष व समाज बांधव यांचे हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. या रथ सोहळ्याचे व सायकल वारीसह क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीत संत नामदेव महिला मंडळाच्या वतीने!विठ्ठल विठ्ठल विठ्ठला!या तालावर महिलांनी "पाऊली"या नृत्याचा आविष्कार सादर केला,पालखी सोहळा व सायकल वारी ची मिरवणूक छत्रपती शिवाजी चौक,बारामती चौक विठ्ठल मंदिर येथे आल्यानंतर करण भांबुरे यांनी डोक्यावर संत नामदेवांच्या पादुका घेतल्या यावेळी महिलांनी ओवाळून व पुष्पवृष्टी करीत स्वागत केल्या नंतर संत नामदेव महाराज यांच्या पादुकांची पूजा करून महाआरती ट्रस्ट चे अध्यक्ष राजेश हेंद्रे यांचे हस्ते करण्यात आल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी वारकरी संप्रदायातील भक्त,शिंपी समाज बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.आज दिं 13 रोजी पहाटे महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पद्मा टाळकुटे यांचे हस्ते महाआरती केल्यानंतर पालखी सोहळा व सायकल वारी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

 शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतुने भागवत धर्माचे प्रचारक संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची ७५४ वी जयंती, संत श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधीदिन सोहळा व शीख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानकदेव यांच्या ५५५ व्या जयंतीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) अशी सुमारे २,३०० किलोमीटरची रथ व सायकल यात्रेचा मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात प्रस्थान झाले . या सायकल यात्रेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सुमारे १०० सायकल यात्रींनी सहभाग नोंदविला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचला तर संत तुकाराम महाराज या धर्माचे कळस झाले . संत शिरोमणी श्री नामदेव महाराजांनी उत्तर भारतात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला व भागवत धर्माची पताका फडकावली. पंजाबमधील शीख धर्मीयांमध्ये आपल्या सात्त्विक विचारांचा प्रभाव तेवत ठेवला. मुगल सम्राट फिरोजशा तुघलक यांनी श्री क्षेत्र घुमाण येथे संत नामदेव महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर उभारले.

श्री विठ्ठल भक्तीचा व शांती , समता व बंधूता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने भागवत धर्म प्रसारक मंडळ, राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ , नामदेव समाजोन्नती परिषद व समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र घुमाण अशी भव्य रथ व सायकल यात्रा २०२२ पासून सुरु करण्यात आली आहे . यामध्ये ५० वारकरी तर १०० सायकल यात्रींचा सहभाग आहे

पंजाबचे राज्यपाल करणार स्वागत
संत नामदेव महाराजांच्या रथ व सायकल यात्रेचे २ डिसेंबर रोजी चंदिगड येथे राजभवन मध्ये पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे स्वागत करणार आहेत. त्यांच्या हस्ते पादुकांची पूजा व सायकल यात्रींचा सन्मान करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER