पिंपरद (ता.फलटण ) गावचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रथम ध्येय असून पिंपरदकर मतदार बंधू भगिनी मला मोठ्या मताधिक्याने विजय करतील हा मला विश्वास आहे.
कै. मा.खा.लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेर बहाद्दर नाईक निंबाळकर यांनी पिंपरद गावच्या विकासासाठी भरीव असे योगदान दिले आहे. राज्यातील व केंद्रातील सत्ता भाजपकडे असल्याने पिंपरद गावच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा पक्षाबरोबर राहणे अत्यंत गरजेचे असल्याने मतदार बंधू भगिनी मला व मरीमाता ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करतील असा विश्वास धैर्य टाईम्सशी बोलताना सौ वैशाली भगत यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना सौ वैशाली भगत यांनी पिंपरद गावच्या विकासाचा जाहीरनामा पुढील प्रमाणे असल्याचे सांगितले.
१. जलजीवन मिशनची पाणी योजना सोलर ऊर्जावर, फिल्टर युक्त, ग्रॅव्हिटीसह स्वयंचलित करण्याचे नियोजन.
२. आरोग्य उपकेंद्रासाठी प्राधान्याने एक महिन्यात जागा ताब्यात घेऊन, सहा महिन्यात इमारत बांधकाम चालू करणे.
३. वडार समाजासाठी जागा उपलब्ध करून समाज मंदिर बांधणे.
४. वडार समाज बांधवांसाठी स्मशानभूमी कंपाउंड वॉल बांधून सुशोभीकरण करणे.
५. मुस्लिम बांधवांच्या दफनभूमीचे सीमा भिंत बांधकामासह सुशोभीकरण करणे.
६. मातंग समाजासाठी सहा युनिटचे शौचालय बांधून देणे.
७. रामोशी समाज बांधवांसाठी खंडोबानगरपर्यंत काँक्रीट रस्त्यासह बंदिस्त गटार योजना करणे
९. बौद्ध समाजासाठी बहुउद्देशीय बुद्ध-विहाराचे भव्य बांधकाम करने.
९. गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण, डांबरीकरण तसेच गावातील सर्व बोळीमध्ये पेव्हर ब्लॉक टाकणे.
१०. खंडोबा मंदिर ते कॅनॉलपर्यंत पानंद रस्ता विकसित करणे.
११. पिंप्रद गाव ते कापसे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
१२. गावठाणातील अतिक्रमित असलेल्या घरांची अतिक्रमणे नियमानुकूल करून नोंदी कायम करणे.
१३. महत्त्वाच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवणे.
१४. जिल्हा परिषद च्या सर्व शाळा डिजिटल करणे.
१५. शाळा, हायस्कूल, सोसायटी, ग्रामपंचायत, अंगणवाड्यांना थेट पध्दतीने व आरओ च्या शुध्द पाण्याची योजना करणे.
१६. शाळा व हायस्कूल साठी शौचालय युनिट बांधणे.
१७. ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्यांच्या विजेचे व पाण्याचे प्रश्न सोडवणे.
१८. बेघर, पात्र घरकुल लाभार्थ्यांना जागा नसेल तर उपलब्ध करून देणे.
१९. घरकुल पात्र लाभार्थ्यांसाठी नव्याने यादी तयार करणे.
२०. महिला बचत गटासाठी बहुउद्देशीय प्रकल्पासाठी इमारत बांधणे.
२१. पिंप्रद-सोनवडी रस्ता तयार करणे.
२२. शिंदे वस्तीसाठी रस्ता तयार करणे.
या जाहीरनाम्यातून पिंपरदच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास सौ भगत यांनी यावेळी व्यक्त केला.