फलटण शहरातील जिंती नाका येथे ऑनलाईन लॉटरी सेंटरवर टाकण्यात आलेल्या धाडीत १३ जणांकडून 34 हजार 460 चे जुगार साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले असून याप्रकरणी १३ जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 1 रोजी शहर पोलिसांना जिंती नाका, मलटण ता. फलटण येथे बिडवे बिल्डींग मधील प्रिमीयम डस्ट चाय नावचा बोर्ड असलेले तळ गाळयात फनगेम नावचे ऑनलाईन लॉटरी सेन्टरवर लोकांचे कडुन बेकायदा पैसे स्विकारून ऑन लाईन लॉटरी अमोल हरीचंद्र घाडगे (रा. मलटण, ता. फलटण. फलटण) हा चालवित आहे अशी माहिती मिळाली असता शहर पोलिसांनी जिंतीनाका फलटण येथे जाऊन सायंकाळी ६.३९ वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता यावेळी ऑनलाईन लॉटरी चालक व जुगार खेळताना अमोल हरीचंद्र घाडगे (वय 42 वर्षे रा. मलटण. ता. फलटण ऑनलाईन लॉटरी मालक), हरीओम विजय टोकशे (वय 19 वर्षे रा. छोटी जवाहर शाळा, ता. जिंतूर, जि. परभणी. हल्ली. रा. महादेव मंदिराजवळ, मलटण, ता. फलटण), मंगेश शंकर बगाडे (वय 29 वर्षे रा. प्रगती नगर, एम आय डी सी बारामती ता. बारामती जि. पुणे.), योगेश संभाजी चव्हाण (वय 24 वर्षे रा. जिंतीनाका, मलटण), करण गणेश काकडे (वय 30 वर्षे रा. मंगळवारपेठ, फलटण), शाम रामचंद्र साळुंखे (वय 49 वर्षे रा. जामदार रोड कसबापेठ, बारामती ता. बारामती), समिर बाळासाहेब शिंदे (वय 33 वर्षे रा. जाधववाडी. ता. फलटण), सचिन शंकर अडागळे (वय 35 वर्षे रा. महादेव मंदीरा जवळ जिंती नाका मलटण ता. फलटण), रविंद्र रामचंद्र घोलप (वय 30 वर्षे महादेव मंदीरा जवळ जिती नाका मलटण ता. फलटण), नागेश पाडुरंग भोसले (वय 35 वर्षे रा. स्वामी समर्थ मंदीरा जवळ मलटण ता. फलटण), अमोल गणपत शिंदे (वय 29 वर्षे रा. ताथवडा. ता. फलटण), आदित्य वैजनाथ चांडसकर (वय 19 वर्षे रा. पितळी मारूती मंदीर नेमगीरी रोड जितुर, ता. जिंतुर, जि. परभणी. हल्ली रा. महादेव मंदिराजवळ, मलटण. ता. फलटण), अभिजीत राजेश लोंढे (वय 27 वर्षे रा जाधववाडी. ता. फलटण) हे आढळून आले व यावेळी त्याच्याजवळील 34 हजार 460 चे जुगार साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी १३ जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.