फलटण प्रतिनिधी:- मौजे वडजल येथे ट्रेलरमध्ये बेल्ट बांधून भरलेले इंजिन नंबर बेल्ट तुटून ट्रेलर मधून खाली पडून इंजिनचे नुकसान केल्या प्रकरणी ट्रेलर चालकाच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मौजे वडजल गावाच्या हद्दीत वाठार निंबाळकरकडे टर्न मारून पुढे जात असताना चालक आनंदा दगडू भापकर (राहणार साखरवाडी ता.फलटण) यांनी ट्रेलर क्रमांक MH 06 AQ 8907 हा बेदरकारपणे रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवून ट्रेलरमध्ये बेल्ट बांधून भरलेले इंजिन नंबर 84551683 इंजिन मॉडेल नंबर QSL9G15 सदर इंजिन ची किंमत 10 लाख 39 हजार 637 अशी असून सदर इंजिन हे बेल्ट तुटून ट्रेलर मधून खाली पडून सदर इंजिनचे नुकसान केले आहे अशी फिर्याद अमोल विजय सरगर (राहणार खराडेवाडी ता. फलटण जि. सातारा) यानी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक करीत आहेत.