माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खा.रणजितसिंह ना.निंबाळकर त्यांच्या सुविद्य पत्नी अॅड सौ.जिजामाला ना.निंबाळकर व कन्या कु.इंदिरा यांनी नवरात्र उत्सवा निमित्त निंबळकचे ग्रामदैवत निमजाई देवी व टाकळवाडेचे ग्रामदैवत पद्ममावतीदेवीचे तसेच राजाळे येथील जानाई देवीचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सपत्नीक टाकळवाडे येथे नवरात्री निम्मित पांडवकालीन सोंगट्याच्या खेळात सहभाग घेतला. यावेळी प्रसिध्द उद्योजक श्री.राम निंबाळकर यांची खा. निंबाळकर यांनी भेट घेतली.
यावेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाअध्यक्ष श्री.नानासो इवरे ,पिंप्ररद सोसायटीचे माजी चेअरमन राहुल भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.