फलटण प्रतिनिधी :
फलटण येथील रविवार पेठेतील महावीर स्तंभाला ट्रकने धडक देऊन स्तंभा नजीकच्या कट्ट्याचे नुकसान केले असून ट्रक चालक फरारी झाला असून ट्रक मधील एक जण दारूचे नशेत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या संदर्भात सविस्तर असे, फलटण मधील रविवार पेठ येथील जैन समाजाची अस्मिता असणारा महावीर स्तंभ आहे. त्या महावीर स्तंभाला MH - 05 EL 7815 या क्रमांकाच्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हलगर्जीपणाने चालवत ट्रक स्तंभाला आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास धडक दिली आहे. या संदर्भात ट्रक मधील एक जण दारूच्या नशेत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा ट्रक सांगली वरून कल्याण (ठाणे ) कडे निघाला होता. या संदर्भात कार्यवाही करण्याचे काम फलटण शहर पोलीस स्टेशनला सुरू असून अधिक सविस्तर वृत्त लवकरच...