Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
दिवाळीच्या मुहूर्तावर फलटणमध्ये ‘निसर्ग पार्क’चा गृहप्रकल्प; फलटण येथे २ बीएचकेच्या ६० बंगल्यांचा भव्य प्रकल्प - बुकिंग सुरू फलटण न्यायालय परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; ४ हजारांची लाच घेताना खासगी वकील रंगेहात जेरबंद दुधेबावी फेस्टिव्हलचे सलग २६ व्या वर्षी आयोजन; ६ नोव्हेंबरपासून रंगणार संत गाडगेबाबा व्याख्यानमाला युवा उद्योजक, यशस्वी बिल्डर आणि धाडसी राजकीय व्यक्तिमत्त्व सागर शहा सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद

खुन प्रकरणातील दोन आरोपीना जन्मठेप व प्रत्येकी रुपये ३ लाख दंडाची शिक्षा.

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनीधी:- मौजे दुधेबावी येथे झालेल्या एका खुनाच्या प्रकरणात दोन आरोपीना जन्मठेप व प्रत्येकी रुपये ३ लाख दंडाची शिक्षा दंडाच्या रकमेपैकी रक्कम रुपये ५ लाख इतकी नुकसान भरपाई मयताच्या कुटुंबियांना देण्यात यावी असा निर्णय जिल्हा व सत्र न्यायाधीश सातारा यांनी दिला आहे.

फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण दि.४/७/२०२० रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मौजे दुधेबावी ता. फलटण जि. सातारा गावचे हद्दीत आरोपी १) हणमंत महादेव सोनवलकर वय ४८ वर्ष, क्र.२) सुनिता हणमंत सोनवलकर वय ३८ वर्ष, क्र.३) अनिकेत हणमंत सोनवलकर वय २३ वर्ष, क्र.४) शंभुराज हणमंत सोनवलकर वय २१ वर्ष सर्व रा. दुधेबावी ता. फलटण जि.सातारा यांनी मयत ज्ञानदेव महादेव सोनवलकर (वय ४० वर्ष रा. दुधेबावी ता. फलटण जि.सातारा) यांना सामाईक जमीन वाटुन देत नाही याकारणावरुन आरोपी हणमंत महादेव सोनवलकर व सुनिता हणमंत सोनवलकर यांनी शिवीगाळ करुन त्यांचे हातातील लोखंडी पाईपने मयत यांना मारहाण केली. 

तसेच आरोपी अनिकेत हणमंत सोनवलकर याने त्याचे हातातील कुन्हाड मयताचे उजवे हाताचे दंडावर मारली व आरोपी शंभुराज हणमंत सोनवलकर याने त्याचे हातात असलेल्या लोखंडी गजाने ज्ञानदेव महादेव सोनवलकर यांच्या डोक्यात मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जखमी केले. ज्ञानदेव महादेव सोनवलकर यांच्या डोक्यास मार लागल्याने रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सुविधा हॉस्पीटल, फलटण येथे अॅडमिट केले व तेथे उपचार घेत असताना त्यांचा मृत्यु झाला होता.

सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस उप-निरीक्षक यु. एस. शेख फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी करुन मा. न्यायालयात दोषारोप पत्र पाठवण्यात आले होते.सदरचा खटला मा.श्री.व्ही. आर. जोशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सो, सातारा यांचे कोर्टात चालला होता. सरकारतर्फे श्रीमती वैशाली पाटील सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, सातारा यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. नमुद केसमध्ये एकुण ११ साक्षीदार तपासले, केवळ परिस्थितीजन्य पुरावा व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे साक्षीवरून तसेच सरकारी वकील यांचा युक्तीवाद व आरोपीने केलेल्या कृत्याबाबत न्यायालयात समोर आलेला पुरावा व सरकारी वकील यांचेकडील पुरावे ग्राह्य मानुन मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सो सातारा यांनी दिनांक २४/१/२०२४ रोजी यातील आरोपी अनिकेत हणमंत सोनवलकर व शंभुराज हणमंत सोनवलकर यांना भा. द. वि. कलम ३०२, ३४ अन्वये जन्मठेप व प्रत्येकी ३ लाख रुपये दंड, दंड न दिलेस १ वर्ष साधा कारावास अशी शिक्षा दिली आहे. सदर दंडाच्या रकमेपैकी रक्कम रुपये ५ लाख इतकी नुकसान भरपाई मयताच्या कुटुंबियांना देण्यात यावी. तसेच आरोपी हणमंत महादेव सोनवलकर व सुनिता हणमंत सोनवलकर यांना CRPC २३५ (१) अन्वये ३०२ या शिक्षा पात्र गुन्हयासाठी निर्दोष मुक्त करणेत आले आहे.

उप-विभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल धस फलटण विभाग फलटण, सुनिल महाडीक पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणुन म.पो.हवा.ब.नं. साधना कदम व पो. अंमलदार ब.नं. बडे नेमणुक फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांनी कामकाज पाहिले. याकामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्क्वॉडचे पोलीस उप-निरीक्षक उदय दळवी, सुनिल सावंत यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा. मंजूर मणेर, म. पो. हवा शेख, पो. अंमलदार अमित भरते यांनी मदत केली.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER