फलटण प्रतिनिधी : क्राईम न्यूज
कुरेशीनगर येथे एका टेम्पोत लहान वासरे कत्तल करण्याचे हेतुने बेकायदा डांबून ठेवल्याचे आढळून आल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एक जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी गाडीसह एकूण १० लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,दिनांक ५ रोजी १०:१५ वाजण्याच्या सुमारास कुरेशीनगर येथील नगरपालीकेच्या उर्दु शाऴेच्या जवळ फलटण ता. फलटण येथे शाहिस्ता कुरेशी (रा. माढा कॉलणी गुणवरे रोड बारामती ता. बारामती जि. पुणे) यांनी त्यांचे आयशर कंपनीच्या चॉकलेटी रंगाचा टेम्पो क्र.एमएच.२५.यू.०९१५ यामध्ये २१ लहान अंदाजे ५ ते १० दिवसाची जर्सी गायीची नर जातीची काळी-पांढरे रंगाची वासरे व अंदाजे एक वर्ष वयाचे जर्सी गायीची नर जातीचे काळ्या पांढ-या रंगाचे वासरू दाटीवाटीने कत्तल करण्याचे हेतुने बेकायदा डांबून ठेवल्याचे आढळून आले. यावेळी १० लाख रुपये किंमतीचा एक चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीचा टेम्पो २१ हजार रुपये किंमतीची २१ लहान अंदाजे ५ ते १० दिवसाची जर्सी गायीची नर जातीची काळी-पांढरे रंगाची वासरे ३ हजार रुपये किंमतीचे त्यामध्ये अंदाजे एक वर्ष वयाचे जर्सी गायीची नर जातीचे काळ्या पांढ-या रंगाचे वासरू असा १० लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलीस शिपाई काकासो कुंडलिक कर्णे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्ह्याचा अधिक तपास पो.हवा विरकर करत आहेत.