धैर्य टाईम्सने बाळासाहेब सोळसकर यांच्या निवडीबद्दलचे वृत्त प्रकाशित केले होते. धैर्य टाईम्सचे भाकीत तंतोतंत खरे ठरल्याने अनेकांनी धैर्य टाईम्सवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
सातारा -
मुंबई बाजार समितीचे मा.सभापती बाळासाहेब सोळसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी मुंबई येथे दिले. यावेळी खा. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, फलटण तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.