फलटण : दिनांक 21 एप्रिल, धैर्य टाईम्स
केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी फलटण शहराच्या विकासासाठी दिलेल्या निधीच्या माध्यमातून इतर कामांच्या बरोबरच फलटण शहरांमध्ये असणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणार असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले, ते फलटण येथे धैर्य टाईम्सशी बोलत होते.
पुढे बोलताना खा. रणजितसिंह म्हणाले, ऐतिहासिक फलटण शहराच्या अनेक चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे इतिहासाची साक्ष देतात. महापुरुषांनी समाज व देशासाठी दिलेले योगदान अनन्य साधारण असेच आहे. त्या महापुरुषांचे आदर्श कार्य आजच्या नव्या पिढीला आत्मसात करणे गरजेचे आहे. त्याकरिता महापुरुषांच्या पुतळा सुशोभीकरणात त्यांच्या कार्याची माहिती अधोरेखित करण्याची संकल्पना असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी निदर्शनास आणून दिले, तर आत्तापर्यंत महापुरुषांचा झालेला अवमान थांबवणार असून यापुढे तरुण पिढी महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेईल या प्रकारे आपण सुशोभीकरणाच्या माध्यमातून काम करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी शेवटी सांगितले.