फलटण प्रतिनिधी : क्राईम न्यूज
दारूच्या नशेत एकास मारहाण केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ रोजी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास गँलँक्सी हाँटेल नाना पाटील चौक फलटण येथे मनोज इंगळे (रा.आखरी रस्ता मंगऴवार पेठ फलटण) व त्याचा अनोळखी मित्र याने दारुच्या नशेत फिर्यादी रिझवान मोहम्मद इलीयास खान (रा.संतोषीमाता नगर मलटण) शिवीगाळ दमदाटी करुन बिअरच्या तीन बाँटल व लोखंडी गज याने डोक्यात मारुन जखमी केले आहे. याप्रकरणी फिर्यादी रिझवान मोहम्मद इलीयास खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास पो.हवा विरकर हे करीत आहेत.