Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

म्हसवड यात्रा अखेर रद्द; लांबूनच मिळणार रथाचे दर्शन

लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच प्रवेश, प्रांतांच्या बैठकीत निर्णय
टीम : धैर्य टाईम्स
Mhaswad Yatra finally canceled; The chariot will be seen from afar
म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

म्हसवड : राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या म्हसवड येथील सिद्धनाथ व माता जोगेश्‍वरीची रविवारी 5 रोजी होणारी रथयात्रा प्रशासनाने अखेर रद्द केली. बॅरिकेंटिंग केलेल्या रथाचे लांबूनच भाविकांना दर्शन घेता येणार असून केवळ लसीकरण झालेल्या भाविकांनाच प्रवेश मिळणार आहे. गुरुवारी प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत यात्रेबाबात सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख, तहसीलदार सूर्यकांत येवले, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे यांच्यासह तालुक्यातील सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.  
माण खटाव मधील यात्रा बाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील निर्देश सूचनाबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. यात्रेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या गावाबाहेरून सहभागी होऊ इच्छिणार्‍या गावाबाहेरून दर्शनासाठी येणार्‍या सर्व भाविकांचे संपूर्ण लसीकरण होणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले
गावाबाहेरून येणार्‍या वैयक्तिक भाविकांच्या लसीकरण कागदपत्र तपासणी आरोग्य विभागाने शिक्षण महसूल नगरपालिका व इतर विभागाच्या मदतीने करून पात्र व्यक्तींची आरटीपीसीआर तपासणी करून पात्र व्यक्तींना रांगेने दर्शनासाठी सोडावे असे सर्वसंमतीने ठरले
 कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून धार्मिक विधी संबंधित व्यक्ती देवस्थान ट्रस्टकडून करण्यास परवानगी देण्यात आली. रथमिरवणुकीस परवानगी नाकारण्यात आली असून रथ हा यात्रा पटांगणात स्थिर राहील त्यांच्याभोवती डबल बँरेकेटींग करण्याचा निर्णय घेण्यात आला. 19 कोरोना च्या सर्व नियमांचे व शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे सूचनांचे पालन करतील त्याच भाविकांना दर्शनास परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही सामूहिक स्वरूपाची कृती करता येणार नाही, मंदिरातील श्रींची मूर्ती व रथावरील पवित्र वस्तू व रथाचे दर्शन बॅरेकेंटिंग च्या बाहेरून घेता येणार असून श्रींची मूर्ती पालखी रथ व सर्व इतर वस्तूंना स्पर्श करण्यास मनाई करण्यात आली आहे. तात्पुरती दुकाने व मनोरंजनाची साधने फेरीवाले हातगाड्या यांना परवानगी नाकारण्यात आली असून वाहनांच्या पार्किंग वाहतूक व व्यवस्थापन पोलीस विभागाला आवश्यक ते निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आल्या.
दिंड्या, सासनकाठ्यांना मनाई
बाहेरगावाहून येणार्‍या दिंड्या पालख्या सासनकाठी इत्यादींना मनाई करण्यात आली असून ध्वनीफित वापराबाबत पोलिस विभागाने आवश्यक असे निर्बंध लावावे, मंदिर व्यवस्थापनाने ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, नगरपालिका स्तरावर मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 24 तास नियंत्रण कक्ष स्थापन करून कार्यवाही करावी, आरोग्य विभागाने तपासणी लसीकरण इत्यादी तपासणी वैद्यकीय अधिकारी यांच्या 10 टीम उपलब्ध कराव्यात त्यांना मदत करण्यासाठी पोलिस विभाग महसूल विभाग निहाय 2 अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, शिक्षण विभागाने 6 शिक्षक उपलब्ध करून द्यावे, नियंत्रण कक्षासाठी प्रत्येक शासकीय विभागाने एक पर्यवेक्षक दर्जाचा अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध करून द्यावा, नगरपालिकेने पोलीस विभागाच्या समन्वयाने आवश्यक ते बॅरेकेंटिंग दि. 3 च्या रात्री 8 पर्यंत करून घ्यावी आणि स्वच्छता पाणीपुरवठा आणि सुविधा पुरवाव्यात इतर सर्व शासकीय विभागांनी आपल्या विभागाच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडाव्या आदी सूचना देण्यात आल्या.
प्रांताधिकारी राहणार दिवसभर
उत्सवाच्या दिवशी पूर्णवेळ कार्यकारी दंडाधिकारी मंदिर व यात्रा पटांगणात उपस्थित राहणार आहेत. एकंदरीतच यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER