फलटण प्रतिनिधी:- वडिलांना का मारले असा जाब विचारला असता गज डोक्यात मारून मारहाण केल्या प्रकरणी तीन जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि ६ रोजी सायंकाळी 7.30 फिर्यादी यांचे वडील श्रीपती यांना गावातील आबाजी रामचंद्र चव्हाण याने शेतातील जमीन गट नं 336 मध्ये असलेल्या पाण्याची पाईप लाईन संदर्भात चर्चा करणेसाठी घरी बोलावून घेतले होते त्यानंतर रात्री ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी इंद्रजीत श्रीपती मसूगडे ( रा मसूगडेवस्ती आदरूड ता फलटण जि सातारा) यांचे वडील श्रीपती हे घरी आले व फिर्यादी यांना म्हणाले की मी आबाजी रामचंद्र चव्हाण याचे घरी पाईप लाईन संदर्भात चर्चा करणेसाठी गेलो असताना मला आबाजी रामचंद्र चव्हाण व त्याची मूले अमर आबाजी चव्हाण, अजित आबाजी चव्हाण यांनी हाताने मारहाण करून शिवीगाळ केली आहे असे सांगितले असता फिर्यादी हे आबाजी रामचंद्र चव्हाण याचे घरासमोर जावून त्यांना विचारले की तूम्ही माझे वडीलांना का मारले तेव्हा बाचाबाची झाली त्यामुळे चिडून आबाजी रामचंद्र चव्हण याने हातात लोखंडी गज फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले . या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.