फलटण प्रतिनिधी : मोजे विडणी येथे महिलेचा विनयभंग करून महिलेला शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ५ रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मोजे विडणी गावचे हद्दीत वरील दोन्ही आरोपी यांनी फिर्यादी महिलेचा घराचा पत्रा काढत असताना फिर्यादी महिलेने आमचे घराचा पत्रात का काढता असे विचारले असता राजेंद्र संपत शिर्के (रा. विडणी ता. फलटण जि. सातारा) याने फिर्यादीचा उजवा हात धरून फिर्यादी महिलेस त्याचे जवळ ओढून शिवीगाळ दमदाटी करून तुला दाखवतोच असे म्हणून फिर्यादीचे साडीचा पदर ओढून फिर्यादीचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच सुरेश संपत शिर्के (रा. विडणी ता. फलटण जि. सातारा) याने फिर्यादी महिलेस व फिर्यादी महिलेच्या बहीण तसेच फिर्यादीचे घरातील कुटुंबीयास शिवीगाळ दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी फिर्यादी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोहवा अडसूळ करत आहेत.