फलटण | धैर्य टाईम्स |
फलटण येथील सुप्रसिद्ध न्यू सिटी बझार या ठिकाणी संक्रात सणाचे औचित्य साधून हळदी- कुंकू कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ. ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी वाण म्हणून महिलांना विविध कंपन्यांची उत्पादने भेट म्हणून देण्यात आली.
सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणारे न्यू सिटी बझारचे मालक डॉ. सूर्यकांत दो शी यांचे सर्वांनी कौतुक केले.