युवकांनी उद्योजक बनले पाहिजे. युवकांनी स्वतः मधल्या क्षमता ओळखून व्यवसायाची सुरवात करावी, असे प्रतिपादन भारतीय युवा ट्रस्ट संस्था सातारा जिल्हा क्लस्टर अधिकारी रोशन अहिरे यांनी केले.
कडेगाव : युवकांनी उद्योजक बनले पाहिजे. युवकांनी स्वतः मधल्या क्षमता ओळखून व्यवसायाची सुरवात करावी, असे प्रतिपादन भारतीय युवा ट्रस्ट संस्था सातारा जिल्हा क्लस्टर अधिकारी रोशन अहिरे यांनी केले.
ते म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्यावतीने कडेगाव तालुक्यातील रायगाव येथे भारतीय युवा ट्रस्ट सातारा यांच्यावतीने उद्योग प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करुन युवा गटातील युवकाना मार्गदर्शन करण्यात आले. कडेगाव युवकांनी उद्योजक बनले पाहिजे. युवकांनी स्वतः मधल्या क्षमता ओळखून व्यवसायची सुरवात करावी.
संस्थेच्यावतीने सहकार्य करण्याचा विश्वास देत त्यांच्यात स्वाभिमान जागृत करण्याचे काम मान्यवरांनी केले. युवकांच्या समुपदेशनाबरोबर युवकांचे शंका- समाधान, त्यांच्या अडचणी समजावून घेत, त्यांना मार्गदर्शन केले. बार्टी व समाज कल्याणच्या युवा गट उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. भारतीय युवा शक्ती ट्रस्टची प्राथमिक माहिती व ती कशा प्रकारे काम करते याची माहिती फिल्ड ऑफिसर विठ्ठल तिकांडे यांनी दिली.
यावेळी सरपंच समाधान घाडगे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, युवक उपस्थित होते. हा कार्यक्रम जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कडेगाव येथील बार्टी समतादुत लता सुरवसे यांनी मानले.