सातारा -
मुंबई बाजार समितीचे मा.सभापती बाळासाहेब सोळसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हा अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकत नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बाळासाहेब सोळसकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
कोरेगाव बाजार समितीचे संचालक बाळासाहेब सोळसकर सलग दोनवेळा मुंबई बाजार समितीचे संचालक म्हणून निवडून गेले होते तर मुंबई बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केले आहे.