Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली :  डॉ. राजेंद्र सरकाळे

टीम : धैर्य टाईम्स
Co-operation gives impetus to economic development of common man: Dr. Rajendra Sarkale
महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, आबासाहेब वीर, आर.डी.पाटील, बाळासाहेब देसाई व इतर धुरिणांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.

सातारा : महाराष्ट्रामध्ये विशेषतः ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून यामध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, डॉ. धनंजयराव गाडगीळ, वैकुंठभाई मेहता, आबासाहेब वीर, आर.डी.पाटील, बाळासाहेब देसाई व इतर धुरिणांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या वेळी ते बोलत होते.
 डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व सहकार सप्ताह शुभारंभ हा दुहेरी संगम असून सहकार अधिक बळकट करण्याची जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे.  भारत देशाचे तुलनेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणांत सहकार चळवळ वाढली असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. सातारा जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ असून सद्या सहकारापुढे अनेक अडी-अडचणी असून, तीव्र स्पर्धेला सामोरे जावून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. बँकेचे मा. संचालक मंडळ सदस्य यांनी आखून दिलेली ध्येय धोरणे यांची प्रभावी अंमलबजावणी बँकेचे अधिकारी, सेवकवर्ग करत असतात. सेवकांनी सहकाराची तत्वे समजून घेवून अधिक प्रभावीपणे कामकाज करावे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा बँकेस मोठी परंपरा असून बँकेचे कामकाज आदर्शवत आहे. बँकेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या कर्ज योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. त्यांची परिणामकारक अंमलबजावणी अंतिम घटकांपर्यंत यशस्वीपणे झालेचे दिसून येते. तव्दतच जिल्ह्यातील शेतकरी सभासदांना दुष्काळ, अतिवृष्टी, जनावरांची छावणी, तसेच कोरोनाच्या काळात आर्थिक तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटपासह यावर्षीही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवर शासकीय रुग्णांलयामध्ये उपचार करण्यासाठी रु ३.००  कोटी खर्च करुन व्हेंटीलेटर, बायपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन्स उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
अन्य अडचणीच्या काळांत बँकेने सर्वतोपरी मदत केलेली असून त्याचा फायदा शेतकरी सभासदांना झालेला आहे. यामधून चांगली सहकारी चळवळ या जिल्ह्यात रूजली आहे. बँकेने ग्राहकांसाठी युपीआयची सुविधा सुरु केलेमुळे ग्राहकांना गुगलपे, फोनपे, पेटीएम, जिओ मनी द्वारे खरेदी व्यवहार करणे, फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत. बँकेच्या QR कोडचा वापर केलेने व्यवहार झाल्यानंतर क्षणार्धात ग्राहकाच्या खात्यावर व्यवहाराची रक्कम वर्ग होत आहे. जिल्हा बँकेच्या  युपीआय सुविधेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील शेतकरी, व्यावसायिक, सभासदांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी केले.
याप्रसंगी सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे , सर्व विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विभाग प्रमुख व सेवकांचे उपस्थितीत सहकार ध्वजाचे ध्वजारोहण झाले. सहकार ध्वजाला मानवंदना दिली. बँकेचे कार्यालयांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER