फलटण प्रतिनीधी:- धुळदेव येथे मोकळ्या शेतात मेंढ्या गेल्या म्हणून सात जणांना मारहाण केल्या प्रकरणी एका महिलेसह चार जणांच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३१ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी धुळदेव रामा नरुटे (रा. मुंडाळे ता. बारामती जि. पुणे) व त्यांच्या सोबत असणारे फिर्यादीचे काका लक्ष्मण विराट ठोंबरे, चुलते सोमा साधू नरुटे, मावस भाऊ सुखदेव लक्ष्मण ठोंबरे, भाऊ साळा रामा नुरुटे, दत्तात्रय रामा नरुटे, चुलत भाऊ गणेश महादेव नरुटे (सर्व राहणार. मुंडाळे ता. बारामती जि पुणे) असे सर्व धुळदेव गावाच्या हद्दीत असणाऱ्या कॅनॉलवर मेंढ्यांना पाणी पाजून पुणे पंढरपूर जाणारे बायपास रोड वरून त्याच्या पालाकडे जात असताना कॅनॉल पासून २०० मीटर अंतरावर पंढरपूर बाजूकडे आले असता.
त्यावेळी तेथे रस्त्यावरून खाली मोकळ्या शेतात मेंढ्या गेल्या म्हणून तिथे असणारे एक पुरुष व एक महिला ( नाव गाव माहित नाही ) या दोघांनी मेंढरांना दगड मारले म्हणून फिर्यादीचे काका लक्ष्मण ठोंबरे म्हणाले की, तुमची काय भरपाई असेल ती घ्या पण आमच्या मेंढरांना मारू नका असे म्हणाल्याच्या कारणावरून त्यांनी कोणाला तरी फोन केला त्यावेळी मोटर सायकल क्रमांक एम एच-11-सी एक्स-3481 वरून तीन जण तेथे आले व त्या सर्वांनी फिर्यादी व इतरांना काठीने व दगडाने मारहाण केली व फिर्यादीच्या काकांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. गंभीर जखमी लक्ष्मण विराट ठोंबरे यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असून सदर प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी एक महिला व चार पुरुष यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार शेंडगे करत आहेत.