फलटण प्रतिनिधी:- पवारवाडी येथे नशेमध्ये गावातील लोकांना वेठीस धरून दुकानावर घरावर दगडफेक करून विनाकारण मारहाण करणाऱ्या आरोपीस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
फलटण ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 28 डिसेंबर रोजी पवारवाडी येथे ऋषिकेश सुनील शेडगे हा नशेमध्ये गावातील लोकांना वेठीस धरून दुकानावर घरावर दगडफेक करून विनाकारण मारहाण करत आहे. तसेच याला नियंत्रण करणे कठीण झालेले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांना मिळाली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट, पोलीस हवालदार साबळे, पोलीस हवालदार चंगन व पोलीस नाईक अभंग यांना पवारवाडीत पाठवून ताब्यात घेतले. ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास सकाळी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्याला मंगळवार पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. सदर आरोपीची रवानगी सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. विनाकारण लोकांना वेठीस धरणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई होईल असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली असून पोलीसांच्या या कारवाईने आसू पवारवाडी समाधान व्यक्त होत आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल व उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.