Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

जिल्ह्यात लसीकरणात सातारा तालुका प्रथम क्रमांकावर

कराड दुसऱ्या, फलटण तिसऱ्या क्रमांकावर : जिल्ह्यात पहिल्या डोसचे 88 टक्के, दुसऱ्या डोसचे लसीकरण 48 टक्के
टीम : धैर्य टाईम्स
Satara taluka ranks first in vaccination in the district
जिल्ह्यात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून ते उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झालेले आहे. यामध्ये सातारा प्रथम, कराड द्वितीय व फलटण तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

सातारा : गत पाच ते सहा महिन्यापासून जिल्ह्यात लसीकरण सुरु असून या कालावधीत काही अपवाद सोडता लसीकरण गतीने झालेले आहे. जिल्ह्यात 22 लाख 79 हजार 500 नागरिकांचे लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, आजमितीस जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 31 लाख 17 हजार 885 एवढे लसीकरण झाले असून ते उद्दिष्टपैकी 88 टक्के एवढे झालेले आहे. यामध्ये सातारा प्रथम, कराड द्वितीय व फलटण तिसऱ्या क्रमांकावर आहे.  
जिल्ह्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 20 लाख 16 हजार 162 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 11 लाख 1 हजार 723 एवढी आहे. सातारा तालुक्यात 3 लाख 86 हजार 218 एवढे उद्दिष्ट होते ते 100 टक्के पूर्ण झाले असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 6 लाख 13ग्न हजार 815 एवढी झालेली आहे. दुसरा डोसही 59 टक्के पूर्ण झाला असून फक्त 1 लाख 59 हजार 802 नागरिकांनी दुसरा डोस घेतला की 200 टक्के लसीकरण पूर्ण आहे.  
कराड तालुका दुसऱ्या क्रमाकांवर  
कराड तालुक्यात 4 लाख 45 हजार 164 लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 5 लाख 96 हजार 413 एवढी झालेली आहे. त्यापैकी 3 लाख 88 हजार 430 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून 88 टक्के लसीकरण पूर्ण झालेय. तर 2 लाख 7 हजार 983 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्याप 56 हजार 734 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 2 लाख 37 हजार 181 जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही.  
फलटण तालुका तिसऱ्या क्रमांकावर
फलटण तालुक्यात 2 लाख 58 हजार 458 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 3 लाख 39 हजार 433 एवढी आहे. यामध्ये 2 लाख 29 हजार 154 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 1 लाख 10 हजार 279 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 29 हजार 304 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 48 हजार 179 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
पाटण तालुक्यात 75 टक्के लसीकरण
पाटण तालुका चौथ्या क्रमाकांवर असून तिथे 2 लाख 36 हजार 777 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 2 लाख 67 हजार 58 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 76 हजार 945 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 90 हजार 113 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 59 हजार 832 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 46 हजार 664 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
कोरेगाव तालुक्यात 84 टक्के लसीकरण
कोरेगाव तालुका पाचव्या क्रमाकांवर असून तिथे 2 लाख 397 लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 2 लाख 62 हजार 913 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 67 हजार 872 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 95 हजार 41 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 32 हजार 525 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 53 हजार 356 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
खटाव तालुक्यात 82 टक्के लसीकरण
खटाव तालुका सहाव्या क्रमाकांवर असून तिथे 2 लाख 9 हजार 454  लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 2 लाख 6 हजार 6 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 71 हजार 41 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 88 हजार 965 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 32 हजार 525 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 1 लाख 20 हजार 489 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
खंडाळा तालुक्यात 124 टक्के लसीकरण
खंडाळा तालुका टक्केवारीनुसार पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, उद्दिष्टानुसार सातव्या क्रमाकांवर असून तिथे 95 हजार 172 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 86 हजार 283 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 17 हजार 888 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला असून हे प्रमाण 124 टक्के एवढे आहे. तर 68 हजार 395 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. तर फक्त दुसरा डोस न घेणारे फक्त 26 हजार 777 नागरिक उरले आहेत.  
वाई तालुक्यात 78 टक्के लसीकरण  
वाई तालुका आठव्या क्रमाकांवर असून तिथे 1 लाख 54 हजार 838  लसीकरणाचे उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 84 हजार 807 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 20 हजार 794 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 64 हजार 13 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 34 हजार 44 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 90 हजार 825 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
जावली तालुक्यात 83 टक्के लसीकरण  
जावली तालुका नवव्या क्रमाकांवर असून तिथे 82 हजार 448 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 9 हजार 398 एवढी आहे. यामध्ये 68 हजार 751 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 40 हजार 647 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 13 हजार 697 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 41 हजार 801 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
माण तालुक्यात 84 टक्के लसीकरण  
माण तालुका दहाव्या क्रमाकांवर असून तिथे 1 लाख 58 हजार 541 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 1 लाख 96 हजार 787 एवढी आहे. यामध्ये 1 लाख 32 हजार 590 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 64 हजार 197 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 25 हजार 951 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला नाही तर 94 हजार 344 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
महाबळेश्वर तालुक्यात 102 टक्के लसीकरण
महाबळेश्वर तालुका लोकसंख्येच्या निकषानुसार अकराव्या क्रमाकांवर असून टक्केवारीनुसार तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिथे 52 हजार 33 उद्दिष्ट असून पहिला व दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या 89 हजार 643 एवढी आहे. यामध्ये 53 हजार 30 नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे. तर 36 हजार 613 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. फक्त 102 नागरिक पहिला डोस घेण्याचे राहिले असून 15 हजार 420 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला नाही.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER