महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गामध्ये समाविष्ट करुन आरक्षण मिळावे यासाठी फलटण तालुक्यातील रजनीकांत खटके यांनी दिनांक 15 मार्च 2023 पासून फलटण येथील प्रांताधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत साखळी उपोषण सुरु केलेले आहे. यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) व वंचित बहुजन आघाडी फलटण तालुक्याच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.
धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी दिनांक 20/03/2023 रोजी उपोषणस्थळी समक्ष भेट देऊन फलटण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व फलटण तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला. यावेळी शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे, तालुका महिला आघाडी प्रमुख सुशीला जाधव, शहर संघटीका लता तावरे, शाखाप्रमुख मंगेश खंदारे, वंचित बहुजन आघाडीचे फलटण तालुका अध्यक्ष संदीप काकडे, छत्रपती शिवाजी महाराज-शाहू-फुले-आंबेडकर विद्वत सभा सातारा जिल्हाध्यक्ष अशोक भोसले, शहराध्यक्ष उमेश कांबळे, महिला आघाडी तालुकाध्यक्षा अश्विनी अहिवळे, महिला आघाडी शहराध्यक्षा सपना भोसले, शहर उपाध्यक्ष किरण अहिवळे, अजित कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.



















