फलटण -
विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी 5 फेब्रुवारी सकाळी 6 वाजता आयकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली होती. कारवाईचे गुऱ्हाळ अखेर संपले असून 100 तासानंतर संजीवराजेंना व कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
या कारवाईच्या वेळीही रामराजे यांनी कृपया गर्दी करू नका. खात्याला काम करू द्या. काळजी नसावी. असा संदेश व्हाट्सअप स्टेटस द्वारे आपल्या समर्थकांना दिला होता.
काल रात्री आयकर विभागाची फलटण येथील कारवाई संपल्यानंतर संजीवराजे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व काही अलबेल असल्याचे सांगितले.
आज सकाळी रामराजे नाईक निंबाळकर यांनी, "सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणारच" असे व्हाट्सअप स्टेटस ठेवत राजकीय विरोधकांना गर्भित इशारा दिल्याची चर्चा आता फलटणमध्ये रंगू लागले आहे.