Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

हिरवाईने देवराईला जन्म दिला : सयाजी शिंदे

टीम : धैर्य टाईम्स
Hirvayee gave birth to Devrai: Sayaji Shinde
सातारमधील संध्या चौगुले यांनी उभारलेली ही हिरवाई म्हणजे सह्याद्री देवराईची आई आहे. हिरवाईने देवराईला जन्म दिलाय. यातूनच सह्याद्री देवराईची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, असे मत सह्याद्री देवराईचे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

सातारा : सातारमधील संध्या चौगुले यांनी उभारलेली ही हिरवाई म्हणजे सह्याद्री देवराईची आई आहे. हिरवाईने देवराईला जन्म दिलाय. यातूनच सह्याद्री देवराईची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, असे मत सह्याद्री देवराईचे प्रणेते अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
सदर बझार येथील हिरवाई प्रकल्पामध्ये पांडुरंग चौगुले स्मृतीदिनानिमित्ताने ते बोलत होते. यावेळी हिरवाईचा ११ वा पांडुरंग चौगुले पुरस्कार सह्याद्री देवराई प्रकल्पाचे प्रणेते सयाजी शिंदे यांना ज्येष्ठ करसल्लागार व चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, मी पहिल्यांदा हिरवाई पाहिली त्याचवेळी माझ्या मनात आपणही झाडे लावावीत, असा विचार रुजला. त्यानंतर संध्या चौगुले यांना माझे गाव वेळेकामठी येथे घेऊन गेलो होतो. तेव्हा त्यांनी महिलांची जबाबदारी घेऊन परसबागेत झाडे कोणती व कशी लावायची याबाबत मार्गदर्शन केले. हे काम करताना किती त्रास होतो आणि किती कष्ट करावे लागतात हे सर्व आपण ऐकतो पण जाऊ द्या. संध्याच्या आयुष्यातच पांडुरंग आहे आणि आता झाडे हाच त्यांचा पांडुरंग आहे. चिंता करण्याचे काही कारण नाही. तुझेच काम घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. खरे तर हे काम सर्वांचेच आहे. पुरस्कार वगैरे मला तितके महत्त्वाचे वाटत नाहीत. असे पुरस्कार घेणारे किंवा इतर सेलिब्रिटी ऑक्सिजन देतात का?  सावली देऊ शकतात का? झाडेच आपल्याला ऑक्सिजन देतात. झाडेच मोठे सेलिब्रिटी आहेत. झाडांपुढे आपण नतमस्तक असले पाहिजे. तुमची संपत्ती, मोठेपण हे त्यापुढे काहीच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून आपण वृक्ष बँक तयार करणार आहोत. वृक्ष बँकेतील ही झाडे मोठी होतील तसतसे ते आपल्याला व्याज देत राहतील. यातून शाळा-शाळांपर्यंत, मुला-मुलांपर्यंत झाडे आणि त्यांचे संगोपन करण्याची जाणीव पोहोचवणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. 
पांडुरंग चौगुले आणि संध्या चौगुले यांचे काम आम्ही गेल्या वीस वर्षांपासून बघत आहोत, असे चित्रपट निर्माते अरुण गोडबोले यांनी सांगितले. हिरवाई प्रकल्पाद्वारे अनेक ठिकाणी झाडे लावण्याची एक चळवळ त्यांनी उभी केली आणि या कामाशी आम्ही नेहमीच त्यांच्या पाठीशी राहिलो आणि जिल्ह्यातील मान्यवर आणि ज्येष्ठ लोकांनी हिरवाई ला पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सोमनाथ साबळे म्हणाले, हिरवाईकडे आम्ही सातारकर वृक्षारोपणाचे एक मॉडेल म्हणून पाहतो. आपण सर्वांनी हिरवाई आणि देवराईच्या झाडे जतन करण्याच्या चळवळीत खारीचा वाटा उचलूया. धनंजय शेडबाळे, सुजित शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.
संध्या चौगुले यांनी प्रास्ताविकात  हिरवाईच्या माध्यमातून चालणाऱ्या कामांचा आढावा घेत पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार देण्यामागची भूमिका सांगितली. 
या वेळी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते सामाजिक  कार्यात अग्रेसर असणारे सौ. नीलम आणि समीर मोहिते, वृक्षारोपण व संगोपन करणाऱे, धनंजय चौगुले, वैभव लोटके, सुमीत मतकर, दुर्गळवाडीचे ग्रामस्थ, न्यू इंग्लिश स्कूल अंगापूरचा स्टाफ, पांडुरंग साळुंखे, जि.प.शाळा कटापूरचे आदर्श शिक्षक सुभाष जाधव अशा वृक्ष संगोपन करणाऱ्या कार्यकर्त्यांचे सत्कार घेण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार तानाजी मस्के यांनी मानले. सूत्रसंचालन वनिता वाळके यांनी केले. यावेळी बाळासाहेब बाबर, डॉ. शिल्पा साबळे, गणेश बकरे, राजेंद्र राजपूत, चांदनी शिंदे, धनंजय कारंजकर, स्नेहल कदम, वनिता कदम, सरिता शिंदे, मनीषा मोरे, अनिल भुजबळ, दत्तात्रय कणसे, प्रताप पवार, सर्जेराव पाटील, मनुवेल गावित, शैलजा पाटील, राहुल भेलावे, रमेश भारमळ आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER