फलटण प्रतिनिधी :-
मौजे बरड येथे जर्शी गाईची वासरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २९ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मौजे बरड ता. फलटण गावाच्या हद्दीतील महादेव नारायण पवार ( राहणार राजुरी ता फलटण) यांनी टेम्पो गाडी क्रमांक MH11BL6735 वरील चालक यांनी त्याचे टेम्पो गाडीमध्ये जर्सी जातीच्या 4 वासरे या दाटीवाटीने भरून चारापाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तल करण्यासाठी वाहतूक करीत असताना आढळून आल्या प्रकरणी महादेव नारायण पवार विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पो.हवा. चांगण अधिक तपास करत आहेत.