फलटण प्रतिनिधी - श्रध्देय प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी सोशल मीडिया वर स्वागत काशीद याने गुन्हेगारी स्वरुपाची पोस्ट टाकल्याने समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सर्व भीमसैनिक यांच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज देऊन करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. १८ रोजी रोहन शिंदे मित्र परिवार या व्हाट्स आप ग्रुपवर स्वागत काशीद, (राहणार- नरसोबानगर, कोळकी, फलटण) या गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या व्यक्तीने जाणून बुजून मागासवर्गीय माणसाचा व समाज्याचा अपमान करण्याच्या आणि त्याच बरोबर लोकांना भडकाव सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने एकदम खालच्या दर्जाचे अपशब्द / शिव्या श्रध्देय प्रकाश आंबेडकर यांना दिलेल्या आहेत.
सदर घटनेचे सर्व आवश्यक पुरावे उपलब्ध आहेत, स्वागत काशीद याच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, 1989 चे कलम 3 (1) (आर) आणि भारतीय दंड संहि 1860 चे कलम 504 आणि इतर संबंधित कायदे व कलम, अंतर्गत त्वरित गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सुधीर अहिवळे, हरीश काकडे, सनी काकडे, शाम अहिवळे, विकी काकडे, संग्राम अहिवळे, शिवा अहिवळे,सुभाष गायकवाड, लक्ष्मण काकडे, रोहित अहिवळे, संदीप काकडे,उमेश कांबळे,महादेव गायकवाड,मंगेश आवळे याचबरोबर अनेक भीमसैनिक यावेळी शहर पोलिस ठाण्यात उपस्थित होते.