आ. जयकुमार गोरे यांच्यावर वैयकीय उपचार सुरु असुन भाजपाचे अनेक दिग्गज रुबीत दाखल झालेआहेत. खासदार रणजितसिंह व त्यांचे कुटुंब ही दवाखान्यात उपस्थित आहेत.
फलटण : प्रतिनिधी
माण - खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला फलटणमधील बाणगंगा नदी पुलावरून सुमारे ७० - ८० फुटखाली कोसळुन पडल्याने झालेल्या भिषण अपघातात आ. जयकुमार गोरे सह अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. आ गोरे यांना तात्काळ पुणे येथे उपचारासाठी हलविण्यात आले असुन अन्य गाडी चालक, स्वीय सहाय्यक व अंगरक्षकांना बारामती येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
आ. गोरे यांची प्रकृती उपचाराला उतम प्रतिसाद देत असल्याची माहिती पुणे येथील रुबी हॉस्पीटलमधील डॉक्टरांनी दिली आहे.
नागपूर अधिवेशन कामकाज उरकल्यानंतर आ.गोरे पुणेकडे रवाना झाले पुण्यातुन रात्री उशिरा आपल्या गाडीतुन दहिवडी कडे निघाले होते पहाटे ३ .३०वा पुणे - पंढरपूर मार्गावरील मलठण ( फलटण ) हद्दीत असणाऱ्या बाणगंगा नदीपात्रावरील पुलाचा दगडी कठडा तोडून गाडी नदीपात्रात कोसळुन झालेल्या भिषण अपघातात आ. गोरे सह अन्य तिघे जण जखमी झाले दरम्यान दस्तुरखुद्द आमदारांनी आपल्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती खा. रणजितसिंह यांना आपल्या मोबाईल वरून दिली सुदैवाने खासदार फलटण मध्येच असल्याने तात्काळ खासदारांनी डॉक्टरांची टिम घेवुन काही क्षणार्धात अपघात स्थळ गाठले स्थानिक डॉक्टराच्या टिमने प्राथमिक उपचार केल्यानंतर आ. गोरे यांना पुणे येथे उपचारा साठी तात्काळ हलविण्यात आले
आ.गोरे यांच्या छातीला मार लागला असुन तिन बरगड्यांना दुखापत झाली असुन ते लवकर बरे होतील अशी माहिती खा. रणजितसिंह यांनी पुण्यातील रुबी हॉस्पीटल मधुन दिली आहे.
वैधकीय अधिकारी यांनी आ. गोरे उपचाराला योग्य प्रतिसाद देत असुन घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. आ. गोरे यांचे समवेत त्यांचे स्वीय सहाय्यक रूपेश साळुंखे यांची प्रकृती गंभीर असुन त्यांना बारामती हुन पुणे येथे आज सकाळी हलविण्यात आले आहे अन्य दोघांवर ( विलास दडस व अंगरक्षक बनसोडे ) बारामती व फलटण येथे उपचार सुरु आहेत.
फलटण येथे आ.गोरे यांचेवर प्राथमिक उपचार डॉ .जे.टी पोळ , डॉं हेमंत मगर , डॉ. प्रविण आगवणे, डॉ .भगत, कुलकर्णी, कदम यांच्या टिमने केले.
आ. गोरे यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु असुन भाजपाचे अनेक दिग्गज रुबीत दाखल झाले आहे खासदार खा . रणजितसिंह व त्यांचे कुटुंब ही दवाखान्यात उपस्थित आहेत.