फलटण तालुक्यात भाजपा करत आसलेल्या विकास कामाचा धसका रामराजेंनी घेतला असून नीरा देवधर धरणाचे कामाचे श्रेया आपण त्यांना देतो मात्र त्यांनी मानसिक धक्क्यातून बाहेर पडावे. भाजपाच्या विकास कामाचा रथ असाच पुढे सुरू राहणार असल्याचे सांगत आपण सोळशीत धरण बांधण्याचा प्रस्ताव दिला होता त्याचा सर्वे झाला असून आगामी काही दिवसात या धरणाचे काम सुरु होणार आहे. या धरणातील पाण्याचा फलटण, कोरेगाव,माण या तालुक्यांना होणार आहे.
फलटण तालुक्यातील विकास कामांचा डोंगर पाहून आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानसिक धक्का बसला असून सभेमधून वैफल्यग्रस्तेतून टीका टिप्पणी करत असल्याने त्या मानसिक धक्केतून रामराजे यांनी लवकर बरे व्हावे असा उपरोधिक सल्ला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार रामराजे यांना दिला आहे.
ते फलटण येथील शासकीय विश्राम गृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव शहराध्यक्ष अमोल सस्ते यांची उपस्थिती होती.
फलटण तालुक्यात भाजपा करत आसलेल्या विकास कामाचा धसका रामराजे यांनी घेतला असून नीरा देवधर धरणाचे कामाचे श्रेया आपण रामराजेंना देतो मात्र त्यांनी मानसिक धक्क्यातून बाहेर पडावे असा टोला लगावतानाच खासदार निंबाळकर पुढे म्हणाले, भाजपाच्या विकास कामाचा रथ असाच पुढे सुरू राहणार असल्याचे सांगत आपण सोळशीत धरण बांधण्याचा प्रस्ताव दिला होता त्याचा सर्वेही झाला असून आगामी काही दिवसात या धरणाचे काम सुरु होणार आहे. या धरणातील पाण्याचा फलटण, कोरेगाव, माण या तालुक्यांना मोठा फायदा होणार असून पाणी साठवण्याचे नव्याने जे प्रयोग करता येतील त्याचा पाठपुरावा आपण युद्ध पातळीवर करत आहे.
माढा लोकसभा मतदार संघातील भागात पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय निविदा काढण्यात आल्या आहेत ते ही काम काही दिवसात सुरु होईल. एकूणच लोकसभा मतदार संघात अपुरी कामे पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न सुरु आहे असे खासदार यांनी निदर्शनास आणून दिले.