येथील झेंडा चौक परिसरातून राहत्या घरातून एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील झेंडा चौक परिसरातून राहत्या घरातून एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १९ रोजी सकाळी ९ ते ११.३० वाजण्याच्या सुमारास अंकिता अशोक किर्देत, वय १९, रा. झेंडा चौक, सातारा ही मुलगी राहत्या घरातून आधार कार्डला लॅमिनेशन करण्यासाठी जाते असं सांगून घरातून निघून गेली. ती अद्याप परत न आल्याची तक्रार अनिकेत अशोक किर्दत यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.