फलटण प्रतिनिधी : 29 एप्रिल, धैर्य टाईम्स क्राईम
फलटण शहर पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी फरारी आरोपींना पकडण्याची मोहीम सुरू केली असता दरम्यान दोन खुनांच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या आरोपीस फलटण शहर पोलीस ठाणे यांनी अटक केली.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन अविनाश ऊर्फ अॅडीसन भोसले (रा. इंदीरानगर झोपडपट्टी अकलुज ता. माळशिरस जि. सोलापुर हल्ली रा. कापशी ता. फलटण जि. सातारा) हा दिनांक २७ रोजी सातारा सेशन कोर्ट येथे येणार असलेबाबत पो.नि शंकर पाटील यांना मिळाली असता त्यांनी वरिष्टांचे मागदर्शनाखाली सदर आरोपीस पकडण्याची एक पथक तयार करून त्यांना सातारा येथे रवाना केले.
दिनांक २७ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आरोपी रोशन अविनाश भोसले हा पोलीस पथकास सातारा सेशन कोर्ट से आर.टी.ओ. ऑफिस सातारा येथे रस्त्याने जाताना दिसल्याने आरोपीस पथकातील अधिकारी अंमलदार यांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतला त्यानंतर त्यास फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. सदर आरोपीस प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी फलटण न्यायालय येथे हजर केले असता आरोपीस दिनांक ३/५/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बागर, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहा. पोलीस निरीक्षक नितीन केणेकर, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे, सहा पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहा पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पो. हवालदार चंद्रकांत धापते, पो. नाईक नितीन भोसले, पो. कॉन्स्टेबल काकासो कर्णे यांनी केली.


















