निंभोरे ग्रामपंचायतच्या कार्यालयात सर्व सदस्यांच्याची विशेष सभा बोलावण्यात आली, त्यावेळी अविश्वास ठरावाबाबत गुप्त मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सर्व 9 सदस्यांनी मतदान केले त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 3 तर सरपंच यांच्याबाजूने 6 असे मतदान झाल्याने अविश्वास ठराव फेटाळला असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली
निंभोरे ता. फलटण गावच्या सरपंच कांचन निंबाळकर यांच्याविरोधात इतर सदस्यांनी मनमानी कारभार करीत असून ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे तसेच कोणत्याही कामात सदस्यांना विचारात न घेता कामे करीत असल्याच्या मुद्द्यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची मागणी केली होती तो अविश्वास ठराव 6 विरुद्ध 3 अशा मताधिक्याने त्यांनी जिंकला व लगेचच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कारखाना कार्यस्थळावर जाऊन भेट घेत अधिकृत भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली.
आज शुक्रवार दि 3 मार्च रोजी दुपारी 3 वाजता तहसीलदार समीर यादव यांच्या अध्यक्षतेखाली निंभोरे ग्रामपंचायतच्या कार्यालयात सर्व सदस्यांच्याची विशेष सभा बोलावण्यात आली होती. त्यावेळी अविश्वास ठरावाबाबत गुप्त मतदान घेण्यात आले. त्यामध्ये सर्व 9 सदस्यांनी मतदान केले त्यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 3 तर सरपंच यांच्याबाजूने 6 मतदान झाल्याने अविश्वास ठराव फेटाळला असल्याची माहिती तहसीलदार समीर यादव यांनी दिली यावेळी या मतदान प्रक्रियेमध्ये मंडलाधिकारी जोशी, ग्रामसेवक एम यु शेलार, सहाय्यक पोलीस फौजदार विलास यांनी भाग घेतला.
अविश्वास ठराव फेटाळला गेल्याचे जाहीर होताच सरपंच कांचन निंबाळकर, ह. भ. प. हनुमंत महाराज रणवरे व इतर कार्यकर्त्यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन भाजपा मध्ये जाहीर प्रवेश करीत असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे, सुरेखा कांबळे, माजी उपसरपंच जयश्री मोरे, मुकुंदराव रणवरे, रामचंद्र अडसूळ, शामराव कांबळे, धीरज कांबळे, बाळासो मोहिते, अमित रणवरे उपस्थित होते. सरपंच कांचन निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशाबद्दल तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, माजी जि. पं. सदस्या सौं. जिजामाला नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे, माजी तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, आदींनी अभिनंदन केले आहे.