फलटण तालुक्यातील विविध गावांच्या रस्त्याकरिता राज्याच्या अर्थ संकल्पामध्ये 29.50 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली
फलटण तालुक्यातील विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून फलटण तालुक्यातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये विविध योजनांच्या माध्यमातून 30/ 54, 25 /15 नागरी सुविधा जन सुविधा क वर्ग तीर्थक्षेत्र 50/ 54 या योजनेमधून विविध गावांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राज्याच्या अर्थ संकल्पनांमध्ये १) फलटण - शिंगणापूर - म्हसवड - शेनवडी ते शिंगणापूर घाट संरक्षण भिंत व रस्ता सुधारणा करणे ४ कोटी २) गिरवी नाका ते विंचुर्णी २.५० कोटी ३) ताथवडा ते मानेवाडी फाटा ४ कोटी ४) दऱ्याचीवाडी ते बोडकेवाडी रस्ता सुधारणा करणे ४ कोटी ५) तरडफ - सपकाळ वस्ती ते उपळवे ३ कोटी ६) गिरवी ते मांडवखडक २.५० कोटी ७) विडणी गावाजवळ कॅनल वर नवीन फुलाचे बांधकाम करणे ५ कोटी असे एकूण २५ कोटी ची कामे अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाली तसेच ३०/५४ या योजनेअंतर्गत १२२.१२ लक्ष , ५०/५४ या योजने अंतर्गत १ कोटी, जनसुविधा अंतर्गत ८७ लाख, नागरी सुविधा ४५ लाख, क वर्ग तिर्थक्षेत्र योजनेस २५ लाख, साकव साठी ४० लाख, अशी २९ .५० कोटी ची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे या तालुक्यातील दळणवळण सुलभ होण्यास मदत होईल तालुक्यातील प्रत्येक गाव आता डांबरीरस्त्याने जोडले जाणार आहे. तालुक्याचा सर्वांगिण विकासासाठी मदत करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.