फलटण प्रतिनिधी :- मौजे ताथवडा तालुका फलटण गावच्या हद्दीत शिपुथा नावच्या शिवारात बोरीच्या झाडाखाली मोकळे जागेत तीन पानी जुगार खेळताना फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सुमारे ४ लाख ८१ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला यप्रकरणी सात जणांच्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार,बुधवार दिंनाक २१ रोजी सायंकाळी ५ वाजता मौजे ताथवडा तालुका फलटण गावच्या हद्दीत शिपुथा नावच्या शिवारात बोरीच्या झाडाखाली मोकळे जागेत
तन्वीर अस्लम पटवेकर (वय २४, रा. ढवळ, ता. फलटण), दीपक बापू जाधव (वय ४१, रा. वाघोशी, ता. फलटण), पोपट संपत तरटे (वय ३९, रा. माळवाडी, ता. फलटण), प्रकाश भानुदास गार्डी (वय ३०, रा. ढवळ, ता. फलटण), मल्हारी नामदेव जाधव (वय २६, ता. फलटण), शेखर तुकाराम थोरात
(रा. ढवळ, ता. फलटण) व नाना मसुगडे (रा. ढवळ, ता. फलटण) या सात जणांना तीन पानी जुगार खेळताना फलटण ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून रंगेहाथ पकडले असून या सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यावेळी पोलिसांनी रोख रूपये ९५०, एक होंडा कंपनीची मोटारसायकल (क्र. एमएच-११-सीएस-८३६६) अंदाजे किंमत १ लाख २० हजार , एक हिरो होंडा कंपनीची काळी रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच- ११ एएम-२८६६) अंदाजे किंमत ८० हजार, एक हिरो कंपनीची काळी रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच ११ सीझेड १६४०) अंदाजे किंमत ८० हजार, एक होंडा कंपनीची काळी रंगाची शाईन मोटरसायकल तीस (नंबर नसलेली) अंदाजे किंमत १,लाख १० हजार , व एक हिरो कंपनीची काळी रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल (एमएच ११ डीसी ९५४०) अंदाजे किंमत ९० हजार, असा एकूण ४ लाख ८१ हजार ५६० रुपये मुद्देमाल जुगाराच्या ठिकाणाहून जप्त केला.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने, पोलिस हवालदार नितीन चतुरे, पोलिस अंमलदार अमोल जगदाळे, तात्या कदम, नितीन खरात, दडस यांनी केली.या प्रकरणाचा अधिक तपास पो. ना. पवार करत आहेत.