फलटण प्रतिनिधी :- मौजे कुरवली खुर्द गावच्या हद्दीतील प्रकल्पाच्या शासकीय अधिगृहीत जमिनीतुन ५४० ब्रास मुरूमाची चोरी अज्ञात चोरट्यांनी केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२/०१/२०२३ रोजी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान दि. २०/०४/२०२३ रोजी सकाळी ११:३० वा दरम्यान (नक्की वेळ माहित नाही) मौजे कुरवली खुर्द गावच्या हद्दीतील प्रकल्पाच्या शासकीय अधिगृहीत जमिनीतुन सुमारे ५४० ब्रास मुरूमाची चोरी कोणीतरी अज्ञात चोरट्याने केली आहे. याप्रकरणी शाखा अधिकारी पाटबंधारे शाखा फलटण कार्यालय तेजस राजेंद्र पवार (रा. तेजस्वी अपार्टमेंट बिरदेव नगर फलटण ता. फलटण) यांनी अज्ञात चोरट्याच्या विरूध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक जगदाळे करत आहेत.