Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा

डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय : जेष्ठ पार्श्वगायिका उषा मंगेशकर

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी -


फलटण पंचक्रोशीसह संपूर्ण सातारा जिल्ह्यात अस्थिशल्य चिकित्सक म्हणून प्रख्यात डॉ. प्रसाद जोशी यांनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पुणे, मुंबईच्या धर्तीवर फलटण येथे सर्व वैद्यकीय साधने सुविधांनी सुसज्ज जोशी हॉस्पिटल प्रा. लि., ची उभारणी आणि तेथे सुरू असलेल्या सिटीस्कॅन, एमआरआय, रोबोटीक या सुविधा ग्रामीण भागातील हॉस्पिटलसाठी प्रेरणादायी असून गेल्या २५ वर्षांपासून डॉ. जोशी यांचे यांचे सुरु असलेले वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्य अतुलनीय असल्याचे निदर्शनास आणून देत आमच्या मंगेशकर हॉस्पिटललाही त्यांनी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा ज्येष्ठ पार्श्वगायिका श्रीमती उषा मंगेशकर यांनी व्यक्त केली. 


विद्या वैभव प्रकाशन, पुणे यांच्यावतीने प्रतिवर्षी देण्यात येणारा उषा - वैभव पुरस्कार डॉ. प्रसाद जोशी यांना श्रीमती उषा मंगेशकर यांच्या हस्ते सजाई गार्डन मंगल कार्यालय, फलटण येथील दिमाखदार सोहळ्यात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. ११ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे, पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सुर्यवंशी बेडके, पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली भोसले, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शिनी भोसले, विद्या वैभव प्रकाशनचे अध्यक्ष बकुळ पराडकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, पोलिस निरिक्षक अरविंद काळे व हेमंतकुमार शहा, तहसिलदार डॉ. अभिजित जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. फलटण शहरासह शेजारच्या तालुक्यातील आणि फलटण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         फलटणकर रसिकांनी आपल्याला भरभरुन प्रेम दिले

आतापर्यंत आपण ३ वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने फलटणला आल्याचे निदर्शनास आणून देत पुण्यामध्ये मोठे मंगेशकर हॉस्पिटल असून पुण्याच्या जवळच १२ कि. मी. वर अत्याधुनिक सर्वसोयींनी युक्त असे लता दिनानाथ हॉस्पिटल तसेच संगीत क्षेत्रातील मोठे म्युझीयम उभारण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करतानाच हॉस्पिटलमध्ये रुग्ण संख्या वाढणे हे चांगले लक्षण नाही, परंतू रुग्ण व्याधीमुक्त होवून जाणे हे चांगले लक्षण असल्याचे श्रीमती उषा मंगेशकर यांनी आवर्जून सांगितले.


आपले आजोबा श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर राजेसाहेब यांनी संस्थान काळात आणि त्यानंतरही कर्तबगार आणि विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींना फलटण संस्थान मध्ये आणून सामाजिक प्रबोधनाचे काम करताना इथल्या सर्वसामान्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांचे विचार त्यांचे आदर्श यांचे कर्तुत्व समजावे यासाठीच त्यांचे हे प्रयत्न असल्याचे निदर्शनास आणून देत फलटण प्रमाणेच सातारा जिल्हयातील औंध संस्थानही अशा प्रकारचे काम करत असल्याचे निदर्शनास आणून देत अशीच काहीसी परंपरा बकुळ पराडकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनुबंध कला मंडळाच्या माध्यमातून सुरु केली आहे, त्यांचे हे कार्य निश्चित कौतुकास्पद असल्याचे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आवर्जून सांगितले. फलटण संस्थान आणि मंगेशकर कुटुंबीय यांचे फार जुने संबंध आहेत. आपले ऋणानुबंध कायम रहावेत यासाठी मंगेशकर कुटुंबीय आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी फलटणचा राजवाडा पाहण्यासाठी आवर्जुन यावे असे निमंत्रणही आ. श्रीमंत रामराजे यांनी यावेळी दिले. 


आम्ही राजकारणी इतके वाईट नसल्याचे सांगत पद्मिनी कोल्हापुरे यांनी सारे काही विसरुन आता राजकारणात यावे अशी सूचना करुन आ. श्रीमंत रामराजे म्हणाले, तुमच्या सारख्या व्यक्तींची राजकारणात आवश्यकता आहे, ज्यांना पॉवर पॉलिटिक्स मध्ये इंट्रेस्ट नाही, परंतू सार्वजनिक आयुष्यात काही तरी करायची इच्छा आहे, त्यांनी निश्चित राजकारणात यावे. राजकारण, सत्ता, हॉस्पिटल यामधील सेवा माणूसकी ठेवून करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करतानाच काही माणसे आहेत की, व्यवसायाचा धंदा करत नाहीत तर धंद्याचा व्यवसाय करतात असे स्पष्ट मतही यावेळी आ. श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले.


आजकाल पोलीस खात्याला घाबरायची वेळ आली आहे, तथापि निवृत्त पोलीस कमिशनर मीरा बोरवणकर यांच्यानंतर कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तुम्हीच आहात असे कौतुक अतिरिक्त पोलिस अधिक्षक कडूकर यांचे करताना अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक संध्याकाळ घालवायला मिळाली याचा निश्चित आनंद असल्याचे सांगत डॉ. जोशी यांचे अभिनंदन करुन त्याच्या पुढील वाटचालीस आ. श्रीमंत रामराजे यांनी शुभेच्छा दिल्या.


प्रसन्न जोशी म्हणाले, माझ्या सासुरवाडी कडील आजोळी मला येता आले, याचा मला खूप आनंद आहे, ऋणानुबंध आता स्नेहानुबंधामध्ये रुपांतरित झाला असल्याने माझे एक नवे नाते फलटणशी जोडले गेले आहे. संध्याकाळची वेळ, संगीताची मैफल आणि मान्यवरांसह खूप मोठा जनसमुदाय हे दृश्य अलीकडे धुसर होत चालले आहे. सद्या लोक टी व्ही बघत नाहीत, तर ते आता डिजिटल होत चालले आहेत. अशा स्थितीत एक मराठी माणूस दुसर्‍या मराठी माणसाचा चक्क कौतुक करतो, सत्कार करतो ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे.


मंगेशकर कुटुंबीयांकडून हा पुरस्कार मिळाल्याने जीवनाचे सार्थक झाल्याची भावना व्यक्त करीत डॉ. जोशी म्हणाले, हा पुरस्कार आपली आई व हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना समर्पित करतो. पुरस्काराबद्दल आणि या सोहळ्यास मोठ्या संख्येने मान्यवरांसह फलटणकरांची उपस्थिती लाभल्याबद्दल डॉ. जोशी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.


पुणे - मुबईमध्ये सर्व सोयी सुविधा असतानाही फलटण सारख्या निमशहरी भागात आरोग्य सेवेसाठी आपले आयुष्य घालवणारे डॉ. प्रसाद जोशी यांचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार बकुळ पराडकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले, त्यापूर्वी त्यांनी सर्व उपस्थित यांचे अनुबंध कला मंडळाच्यावतीने स्वागत केले.


अनुबंध कला मंडळातर्फे जोशी हॉस्पिटलच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पुणे येथील सौरभ दफ्तरदार यांचा 'म्युझिकल आरडी' हा सदाबहार संगीत गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याचा शुभारंभ ग्रामीण विकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला त्यावेळी या सर्वांनी डॉ. प्रसाद जोशी यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाची सुरवात श्री गणेश वंदना तसेच मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुधोजी हायस्कूलचे निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले यांनी, समारोप समारोप व आभार प्रदर्शन डॉ. प्राची जोशी यांनी केले.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER