उद्या सोमवार दि.१४ रोजी संध्याकाळी ६ वाजता फलटण येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व मा.खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांची जाहीर सभा होणार आहे.
मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरात व ग्रामीण भागात अनेक विकासकामे मंजुर केली आहे त्यापैकी आसु ते वारूगड रस्ता साठी २८६ कोटी , फलटण शहरातून जाणारा पालखी महामार्ग ७५ कोटी व अंतर्गत शहरातील विविध रस्ता साठी वैशिष्ट्ये पुर्ण योजने अंतर्गत २५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पीएमजेएसवाय अंतर्गत विविध विकासकामासाठी २५ कोटी व फलटण तालुक्यांमध्ये बजेट मधुन २५ कोटी तसेच या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. शहरातील विविध रस्ते व इतर भुमिपुजन झालेनंतर गजानन चौक येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेस प्रल्हादराव साळुंखे पाटील, सचिन कांबळे पाटील व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटनेते अशोकराव जाधव, मंडल अध्यक्ष अमोल सस्ते ,शहराध्यक्ष अनुप शहा , पुर्व मंडल अध्यक्ष बजरंग गावडे यांनी केले आहे.