फलटण -
श्री स्वामी समर्थ महाराजांचा 167 वा प्रकट दिन गुरुवार, दि.23 मार्च रोजी संपन्न होत असून यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ, शिवाजी रोड फलटणच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि.23 मार्च रोजी श्री स्वामी प्रकटदिनी नवलबाई मंगल कार्यालय,फलटण येथे सकाळी 8 वा श्रीं चा अभिषेक, महाआरती, मंत्र ,नामस्मरण, वास्तुशास्त्र, पितृषास्त्र, संख्याशास्त्र, शिवसरोदय शास्त्र याविषयी प पू राजनकाका देशमुखमहाराज यांचे प्रवचन होणार आहे.
सदर कार्यक्रमास व्यसनमुक्त संघटनेचे प पू धैर्यशीलभाऊ देशमुख, प पू नवनाथ महाराज(शेरेचिवाडी) हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत साय 6.30 वा आरती व नंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे तरी या धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.