फलटण नगर परिषद मंगळवार पेठ वार्ड क्रमांक २ मधील विकास कामाचा शुभारंभ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. दिपकराव चव्हाण व सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला.
यामध्ये मंगळवार पेठेतील धम्मयान चौक ते नवल टेलर, सोनिया मित्र मंडळ ते चावडी, माने दुकान ते स्टेट बॅंक ते सचिन अहिवळे घर ते पुणे - पंढरपुर रोड, आईस फॅक्टरी ते भगवान सॅा मिल हे सर्व सिमेंटचे रस्ते, बंदिस्त गटारे तसेच भीमनगर परिसर, खंडेबा मंदिर परिसर , पंचशील चौक परिसर,चावडी परिसर, लष्कर वाडा परिसर, अशी विविध विकास कामे प्रभाग क्रं २ मध्ये चालु आहेत.
सदर कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मा. नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे , फलटण नगर परिषदेचे मा. आरोग्य समिती सभापती तथा नगरसेवक मा. सनी अहिवळे , मा. नगरसेविका सौ वैशालीताई सुधीर अहिवळे, मा.नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, फलटण दर्शन चे संपादक सुधीर अहिवळे, श्रीमंत रामराजे युवा मंच अध्यक्ष राहुल भैया निंबाळकर, मधोजी हायस्कूल फलटण चे उपप्राचार्य मा. श्री सुधीर अहिवळे, आझाद समाज पार्टी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष सनी काकडे, हरिष काकडे, रोहित माने, सिद्धार्थ अहिवळे , राकेश माने, प्रशांत अहिवळे , दलित पॅंथर चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण काकडे,आप्पा गायकवाड ,निलेश मोरे, तसेच कॉंट्रक्टर हेमंत काकडे, अक्षय अहिवळे, विशाल गुंजाळ, मुकुल अहिवळे, तेजस भोसले, रवी मोरे, आदित्य साबळे व इतर मान्यवर उपस्थित होते.