बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान महाबळेश्वरहुन वाईला येणारी जीप (एमएच ११ एके ८२१५) किसन वीर महाविद्यालयाच्या पुढे उतारावरून भरधाव वेगात येत असताना या जीपने एका दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेलाही ठोकरले. नंतर ही जीप धोम उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात पडली.
सातारा : महाबळेश्वरहुन वाईला येणाऱ्या जीपने दुचाकीला व रस्त्याने चालणाऱ्या महिलेला धडक देऊन जीप धोम धरणाच्या उजव्या कालव्यात कोसळली. या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान महाबळेश्वरहुन वाईला येणारी जीप (एमएच ११ एके ८२१५) किसन वीर महाविद्यालयाच्या पुढे उतारावरून भरधाव वेगात येत असताना या जीपने एका दुचाकीला मागून धडक दिली. यानंतर रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या महिलेलाही ठोकरले. नंतर ही जीप धोम उजव्या कालव्याच्या कठड्याला धडकून कालव्यात पडली. यामुळे या अपघातात दुचाकीचालक, चालणारी महिला व जीपचा चालक गंभीर जखमी झाले. या सर्वांवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी कालव्यातून जीप बाहेर काढून पोलीस ठाण्यात लावली आहे. या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. मात्र हा अपघात झाला तेव्हा या परिसरात गर्दी कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जीपमध्ये एकटा चालकच होता. अन्यथा पाण्याने भरून वाहणाऱ्या कालव्यामुळे मोठा अनर्थ घडला असता. जखमी महिला कोमल अमोल माने (वय २३, रा. फुलेवाडी, कोल्हापूर), दुचाकी चालक नागेश शंकर कोष्टी (रा. सोनजाईनगर, वाई) यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी वायदंडे अधिक तपास करत आहेत.