राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ. महादेवजी जानकर साहेब यांच्या प्रयत्नातून मौजे जाधववाडी ता.कोरेगाव (जि. सातारा ) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेतून विहीर, पाईप लाईन, पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था कामी ५४ लक्ष निधी मंजूर केला असून या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मंगळवार दि. १८/१०/२०२२ रोजी सायंकाळी 5 वाजता मा.आ. महादेवजी जानकर साहेब राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष, मा. कॅबिनेट मंत्री यांच्या शुभहस्ते संपन्न होत असल्याची माहिती संयोजकां कडून देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ शेवते प्रदेश अध्यक्ष,रा.स.प. महाराष्ट्र यांची उपस्थिती असणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर ( माऊली ) सलगर मुख्य महासचिव रा.स.प. महाराष्ट्र असणार आहेत.
या कार्यक्रमास बबनदादा विरकर रा.स.प. उपाध्यक्ष, सौ.वैशालीताई विरकर रा.स.प. प्रदेश सदस्या, खंडेराव सरक जि. अध्यक्ष रा.स.प. सातारा, श्रीकांत देवकर रा.स.प. जि.अध्यक्ष, भाऊसाहेब वाघ रा.स.प. सचिव महाराष्ट्र, अॅड . संजय माने रा.स.प.अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, सौ. पूजाताई घाडगे रा.स.प. महिला जिह्वा अध्यक्षा, कुणाल जाधव विधार्थी आघाडी, निलेश भोईटे अध्यक्ष रा.स.प. ता.अध्यक्ष कोरेगाव यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन रामचंद्र जाधव सरपंच, जाधववाडी ता.कोरेगाव, श्रीमंत भाऊसो वाघ उपसरपंच व युवक ता.आ. कोरेगाव, सर्व ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थ जाधववाडी, ता. कोरेगाव, अरुण राऊत, ग्रामसेवक सुशिला मदने, ग्रामसेवक आदीनी केले आहे.