तब्ब्ल नऊ वर्षांपूर्वी २० जानेवारी २०१४ रोजी फिर्यादी वाजेगाव, ता. फलटणच्या हद्दीत पहाटे ०४.१५ वा. चे सुमारास फलटण- पंढरपूररोडने जात असताना येथील एस. टी. स्टॅण्डजवळ गाडीमध्ये पाणी भरण्यासाठी थांबले होते. त्यावेळी चार अनोळखी आरोपींनी त्यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख १०,०००/-रु. व एक मोबाईल हॅण्डसेट जबरदस्तीने चोरुन नेल्याबाबतच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात एकूण ४ आरोपी निष्पन्न झाले होते त्यापैकी ३ आरोपीना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, मात्र त्यातील चौथा आरोपी लखन डायऱ्या पवार रा. माळशिरस जि. सोलापूर हा फरार होता. यास तब्बल ९ वर्षांनी फलटण ग्रामीम पोलिसांनी जेरबंद करण्यात अखेर यश मिळवले.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी १) गुलजार उर्फ महेंद्र मिस्टींग्या काळे वय २२ वर्ष, रा. बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे २) डुब्ल्या छबु काळे वय २८ वर्ष, रा. फोंडशीरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर ३) जॉकी डाय-या पवार वय २४ वर्ष, रा. भिमनगर, धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर ४) लखन डाय-या पवार, रा. भिमनगर, धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची नावे निष्पन्न होऊन गुलजार उर्फ महेंद्र मिस्टींग्या काळे, डुब्या छबु काळे व जॉकी डाय-या पवार यांना अटक करून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. परंतु आरोपी लखन डाय-या पवार हा सन २०१४ पासून फरार होऊन वेळोवेळी राहण्याची ठिकाणे बदलुन मोबाईल हॅण्डसेटचा वापर न करता पोलीसांना गुंगारा देत होता. दि. १५/०७/२०२२ रोजी आरोपी लखन डाय-या पवार, रा. भिमनगर, धर्मपुरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर हा मुंजवडी, ता. फलटण या ठिकाणी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन गोपनीय बातमीदारामार्फत त्याच्या ठावठिकाण्याची अचुक माहिती काढुन सापळा लावुन त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो त्यावेळी पडणा-या मुसळधार पावसाचा गैरफायदा घेत बाजुच्या ऊसाचे शेतात पळू लागला. परंतु तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत ऊसाचे शेतात घुसून गुडघाभर चिखलातून त्याचा पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले आहे.
अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक, सातारा, श्री अजित बो-हाडे, अपर पोलीस अधीक्षक, सातारा व तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण उपविभाग यांच्या सूचनेप्रमाणे धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, पोलीस अमंलदार सुधाकर सूर्यवंशी, दादासाहेब यादव, महेश जगदाळे व गणेश अवघडे यांनी सदरची कारवाई केलेली आहे.