राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये २५ नगरसेवक वाढणार आहेत. शासनाच्या या निर्णयाने वॉर्ड आरक्षण आणि वॉर्ड रचना यांच्यात फेरबदल होऊन मतदारसंख्या मात्र निश्चित विभागली जाणार आहे.
सातारा : हद्दवाढीनंतरचे आठ आणि राज्यमंत्री मंडळ निर्णयामुळे वाढलेले आठ असे सातारा नगरपालिकेच्या नगरसेवक संख्येत 16 ने वाढ झाली असून येत्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर 56 नगरसेवक सभागृहात सातारा शहराचे प्रतिनिधित्व करणार असून पालिकेच्या छत्रपती सभागृहात चांगलीच दाटावाटी होणार आहे.
राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाला आहे. सातारा जिल्ह्यातील आठ नगरपालिकांमध्ये २५ नगरसेवक वाढणार आहेत. शासनाच्या या निर्णयाने वॉर्ड आरक्षण आणि वॉर्ड रचना यांच्यात फेरबदल होऊन मतदारसंख्या मात्र निश्चित विभागली जाणार आहे.
जिल्ह्यात नऊ नगरपालिका व सात नगरपंचायती आहेत. नऊ पालिकांपैकी मलकापूर नगरपंचायतीची निवडणूक झालेली आहे. त्यामुळे आठ नगरपालिकांची नगरसेवक संख्या नव्या निर्णयानुसार १५ टक्क्यांनी वाढणार आहे. यामध्ये सातारा पालिकेची हद्दवाढ झालेली असल्याने मूळच्या ४० नगरसेवक संख्येमध्ये हद्दवाढीनंतर नगरसेवक संख्या ४८ झाली होती. आता शासनाच्या नव्या निर्णयानुसार १५ टक्के वाढ होणार असल्याने सातारा पालिकेत आठ नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे येथील नगरसेवकांची संख्या ५६ होणार आहे. सातारा शहरात एकूण वीस प्रभाग होते ती संख्या 28 वर जाणार असून प्रभागाची सदस्य संख्या 7648 वरून घटून 4200. ते 4400 वर येण्याची शक्यता आहे. साताऱ्यात टोकाचा विरोध वाढलेल्या खासदार व आमदार गटात राजकीय चुरस वाढण्यासाठी सदस्य वाढीचे निमित्त मिळाले आहे. शहराचा उत्तर पूर्व यांच्यातील नैऋत्य कोपरा शोधल्यास तर भूविकास बँकेच्या चौकातून सरळ रेषा पकडली तर ताम जाईनगर येथील गणेश कॉलनीचा भाग येतो तो शहराचा वॉर्ड क्रं एक असणार असून पश्चिमेला बोगद्याजवळ किंवा चिपळूणकर बागेचा दक्षिण कोपरा 28 व्या प्रभागाचा शेवट होणार आहे. आरक्षण प्रक्रियेत मागास प्रवर्गातील उमेदवार विशेषतः अनुसुचित जमातीचे उमेदवार देताना आमदार व खासदार गटाला काळजीपूर्वक धोरणे राबवावी लागणार आहेत.
यासोबतच कराड पालिकेत सध्याची नगरसेवक संख्या २९ असून, येथे चार, तर फलटण पालिकेत २५ नगरसेवक असून येथे तीन नगरसेवक वाढणार आहेत. वाई पालिकेत २० नगरसेवक असून, येथे तीन नगरसेवक वाढणार आहेत. महाबळेश्वर, पाचगणी, म्हसवड, रहिमतपूर पालिकेत प्रत्येकी १७ नगरसेवक असून, येथे प्रत्येकी दोन नगरसेवक वाढणार आहेत. त्यानुसार एकूण २५ नगरसेवक वाढणार आहेत. याचा नव्याने हद्दवाढ झालेल्या सातारा पालिकेतील इच्छुकांना फायदा होणार आहे.