निंभोरे ता. फलटण येथे एका शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याविषयी शिवाजी बुवासाहेब भोसले यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन मधून मिळालेली हकीकत अशी, निंभोरे ता. फलटण येथील धनंजय संभाजी भोसले वय वर्ष ३३ यांनीआज सोमवार दि.१२ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार यादव करीत आहेत