Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार : विकासाचा ध्यास, जनतेच्या विश्वासाचा वारसा गुरुवारी २३ जुलै रोजी महाराष्ट्र बंद ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांचे निधन; शरद पवारांचे निष्ठावंत सहकारी काळाच्या पडद्याआड राजकारण गेलं चुलीत... नंदकुमार मोरे यांचा पहाटे 1 वाजून 56 मिनिटांचा शेवटचा व्हाट्सअप मेसेज डराडो एनजीओतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकरी माऊलींसाठी चहा, बिस्कीट व पाणी वाटप फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन पोपटराव काकडे यांचे अकस्मात निधन राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम ; श्रीमंत संजीवराजे यांची भेट राजे उमाजी नाईक तालीम गणेशोत्सव मंडळ व कै. शाहूजी नाना मदने मित्र मंडळाचा सेवाभावी उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत दवाखान्याचा लाभ वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुवर्णकार समाजाचा सेवाभावी उपक्रम; संत नरहरी महाराज संस्थेकडून बिस्कीट वाटप लढाऊ पत्रकारितेचा बुलंद आवाज प्रा. रमेश आढाव वनविभागामार्फत हरित वारी वृक्षदिंडी उत्साहात संपन्न ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवार दि. १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची मान्यता भारतीय संशोधनाचा जागतिक ठसा : के.बी. बायो ऑरगॅनिक्सच्या तंत्रज्ञानाला केंद्रीय कीटकनाशक बोर्डाची (CIB & RC) मान्यता फलटण वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष व सचिवपदासाठी थेट लढत चार पदे बिनविरोध; विधी क्षेत्राचे निवडणुकीकडे लागले लक्ष फलटणच्या काजल ऋतुराज भोईटे यांना 'दादासाहेब फाळके इंटरनॅशनल कॉन्टेंट क्रिएटर अवॉर्ड 2026'; फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा शेतकऱ्यांच्या बांधावरून फुललेली सेंद्रिय शेतीची चळवळ; युवा उद्योजक सचिन यादव यांचे उल्लेखनीय योगदान आनंदराव (बाबा) शितोळे यांचे निधन सामाजिक न्यायाच्या शिल्पकाराला विसरतोय समाज ? फलटण तालुक्यात खाजगी सावकारीचा सुळसुळाट; नूतन डीवायएसपी धन्यकुमार गोडसे यांच्यासमोर मोठे आव्हान फलटण-पंढरपूर रोडवरील ढाब्यांमध्ये बालमजुर ; परराज्यातील अल्पवयीन मुलांकडून १२ ते १५ तास काम करून घेत असल्याची चर्चा 45 व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब शिंगाडे यांची 45 किमी धाव पूर्ण; निरोगी जीवनशैलीचा प्रेरणादायी संदेश नगराध्यक्षांच्या आदेशाला कोलदंडा? बाबासाहेब आंबेडकर चौकातील रस्ता पुन्हा उकरल्याने फलटणमध्ये चर्चा मुलाखत बहाद्दरांचे शिवसेनेसाठी योगदान काय ? संजीवराजे, चंद्रहार पाटील, रेश्मा जगताप हे सगळे अवघ्या ६ महिन्यांपूर्वी पक्षात आलेले नेते - चंद्रकांत जाधवांचा घणाघात श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या ६७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न विडणीत भव्य श्री शंकरगीता पारायण सोहळा संपन्न भारतीय सॉफ्ट हॉकी संघाच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार लखन मोरे यांचा के. बी. उद्योग समूहाकडून गौरव फलटण ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई; २ गावठी पिस्टल, काडतूसांसह ४ आरोपी जेरबंद विडणी येथे आधार नोंदणी व अद्यावत शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद इतरांचे अतिक्रमण काढणारी पालिका स्वतःच नियमभंगात? रस्त्याच्या मध्यभागी फलक लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांची विडणी ग्रामपंचायतीस सदिच्छा भेट; विकासकामांची केली पाहणी सोनिया चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दहावी-बारावी गुणवंतांचा गौरव; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप घरगुती सोलर योजनेला नागरिकांचा वाढता प्रतिसाद; वीज बिलातून दिलासा मिळण्याची संधी डॉ. प्रसाद जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित तरसाच्या वाढत्या वावराने जाधववाडी परिसरात भीतीचे वातावरण ताथवडे येथे डराडो संस्थेतर्फे वृक्षारोपण; कै. ॲड. धोंडीराम खरात यांना अभिवादन

नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांची कामे रखडली

तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन छेडण्याचा लाभार्थ्यांचा इशारा
टीम : धैर्य टाईम्स
कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. 

कुमठे : कोरेगाव नगरपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षित कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांची कामे रखडली आहेत. नगरपंचायत विविध थातूर मातूर कारणे देऊन लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे, त्याच्या निषेधार्थ शनिवार, दि. 1 मे 2021 रोजी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्राच्या दिनाच्या ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा लाभार्थ्यांनी दिला आहे. 

जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, नगरपालिका प्रशासन विभागाचे प्रशासन अधिकारी अभिजित बापट यांना शहरातील लाभार्थ्यांनी निवेदन दिले असून, त्यामध्ये धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोरेगाव नगरपंचायतीमार्फत पंतप्रधान आवास योजना राबविण्यात आलेली असून, त्यासाठी स्वतंत्र स्थापत्य अभियंत्याची नेमणूक देखील करण्यात आलेली होती. योजनेच्या अंमलबजावणीच्या पहिल्या दिवसापासून नगरपंचायतीमध्ये अनागोंदी सुरू असून, या विभागासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची भाषाशैली अत्यंत वाईट आहे. लाभार्थ्यांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही, अभियंता काम सोडून गेला आहे, त्याच्याकडे कपाटाच्या चाव्या आहेत, शासनाकडून निधी आला नाही, असे सांगत लाभार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. 

पंतप्रधान आवास योजना ही केंद्र आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविली जात आहे. या योजनेच्या यशस्वितेसाठी नगरपंचायतीस कोणतेही सुख अथवा दु:ख नाही. अनेक दिवसांपासून स्थापत्य अभियंत्याचे पद रिक्त आहे. त्याबाबत विचारणा केल्यावर सुद्धा पदाधिकारी अथवा अधिकारी-कर्मचारी व्यवस्थित माहिती देत नाहीत, असा आजवरचा अनुभव आहे. या संदर्भात नगरपालिका प्रशासन विभागाचे तत्कालीन प्रशासन अधिकारी सचिन पवार यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करण्यात आलेली होती. मात्र, त्यांनी मुख्याधिकार्‍यांना तोंडी सूचना देण्यापलीकडे काहीच केले नाही. 

नगरपंचायतीमध्ये पूनम कदम, प्रमोद सव्वाखंडे, गोसावी, अशोक कुंभार, विनायक औंधकर यांच्यासह कपिल जगताप या मुख्याधिकार्‍यांच्या कार्यकालामध्ये या योजनेस अपेक्षित गती मिळालेली नाही. तब्बल सहा मुख्याधिकारी बदलून गेले तरी योजना मूर्त स्वरूप घेऊ शकलेली नाही. सध्याच्या मुख्याधिकारी विजया घाडगे या योजनेसाठी म्हणाव्या अशा आग्रही नाहीत. त्यांना वारंवार भेटून देखील, त्या दखल घेत नाहीत. या संदर्भात आ. शशिकांत शिंदे व आ. महेश शिंदे यांनी देखील सूचना केल्या आहेत, मात्र नगरपंचायत प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. 

एकंदरीत नगरपंचायतीला लाभार्थ्यांना लाभ द्यायचा नाही, असे चित्र आहे. त्यामुळे सर्व लाभार्थी हे दि. 1 मे 2021 रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर राष्ट्रीय ध्वजारोहणावेळी धरणे आंदोलन छेडणार आहेत, असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. 

या निवेदनावर पोपट येवले, विलास सरगडे, चैताली भोसले, शशिकांत जाधव, शकुंतला जाधव, उषा बर्गे, मनोहर राऊत, संजय पवार, प्रशांत गुरव, सचिन गुरव, गजानन बारटक्के, राजेंद्र बारटक्के, लक्ष्मी पवार, वाजीद मणेर, शंकर बोतालजी आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. 

या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी ज्योती पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे, तहसीलदार अमोल कदम, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व मुख्याधिकारी विजया घाडगे यांना सादर करण्यात आलेल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER