राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी धैर्य टाइम्सचे संपादक, व धैर्य टाईम्स फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन संपतराव मोरे यांची नुकतीच निवड झाली. या पार्श्वभूमीवर फलटण शहरासह तालुक्यातून सचिन मोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी धैर्य टाइम्सचे संपादक, व धैर्य टाईम्स फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन संपतराव मोरे यांची नुकतीच निवड झाली. या पार्श्वभूमीवर विद्युत क्षेत्र कामगार युनियन सातारा सर्कल व श्रीराम वीज कामगार सह पतसंस्था फलटणच्या यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सातारा सर्कलचे अध्यक्ष शरद मोहन मोरे व श्रीराम वीज कामगार सह.पतसंस्था,फलटण चे विद्यमान संचालक स्नेहित टोपे व वि.क्षे.तां.का. यूनियन फलटणचे विभागीय संघटक तानाजी पवार तसेच महावितरण फलटणचे बाह्यस्त्रोत कर्मचारी अक्षय गाडे, सनी ढवळे, व सहकारी मित्र तसेच धुमाळवाडी गावचे युवा बागायतदार सौरव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.