फलटण( प्रतिनिधी ) पारंपरिक वाद्दाचा वापर करीत गणेश विसर्जन मिरवणूका शांततेत, आनंदात काढाव्यात. डॉल्बी बंदीच्या आदेशाचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई अटळ असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी स्पष्ट करुन विसर्जन मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अथवा कुठलाही गैर प्रकार सहन केला जाणार नसल्याचा इशारा सुद्धा बरडे यांनी यावेळी दिला. फलटण शहर पोलीस ठाण्यात आयोजित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासो पवार उपस्थित होते.यावेळी तानाजी बरडे यांनी अध्यक्ष व पदाधिकारी यांना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या संदर्भात सूचना दिल्या. फलटण शहरासह ग्रामीण भागाला ऐतिहासिक व पारंपारिक परंपरा व वारसा लाभलेला असून गणेश विसर्जन मिरवणुका पारंपारिक पद्धतीने व पारंपारिक वाद्यांसह काढाव्यात सर्वोच्च न्यायालयाने डॉल्बी वाजवण्यावर बंदी घातली आहे. तसेच मा.जिल्हादंडाधिकारी ,सातारा यांनी सातारा जिल्हयामध्ये दिनांक ३१/०८/२०२२ रोजीचे सकाळी ०७.०० वा पासून ते दिनांक १० / ० ९ / २०२२ रोजीचे १०.०० वा . पर्यंत या कालावधीसाठी मा.ना. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील याचिका क्रमांक १७३ / २०१० मध्ये ध्वनी प्रदुषण ( नियंत्रण य नियमन ) नियम २००० च्या नियम ३ ( १ ) आणि ४ ( १ ) मध्ये आवाजाच्या गुणवत्तेची मानके / मर्यादा मध्ये ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक / डॉल्बी वाजविणेस परवानगी तसेच मा.ना. उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील याचिका क्रमांक १७३ / २०१० मध्ये ध्वनी प्रदुषण ( नियंत्रण व नियमन ) नियम २००० च्या नियम ३ ( १ ) आणि ४ ( १ ) मध्ये आवाजाच्या गुणवत्तेची मानकांचे उल्लंघनास प्रतिबंध करणेत येत आहे . सदर आवाजाच्या गुणवत्तेची मानकांचे उल्लंघन करणारे ध्वनीक्षेपक / ध्वनीवर्धक / डॉल्बी चालक / मालक / धारक तसेच संबंधित गणेश मंडळांचे पदाधिकारी यांचेवर नियमानुसार कारवाई पोलीस विभाग यांचेमार्फत करणेत यावी.मंडळांनी व डॉल्बी धारकांनी या आदेशाचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई अटळ असल्याचा इशारा पोलीस उपाधीक्षक तानाजी बरडे यांनी यावेळी दिला.गणेशोत्सव शांततेत, आनंदात साजरा करावा.या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही. कुठलाही गैर प्रकार सहन केला जाणार नाही असा इशारा ही बरडे यांनी यावेळी दिला आहे.