फलटण प्रतिनिधि - आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याला काही दिवसांचा अवधी असताना आज शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळावा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे काय बोलणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन करत, आमदारकीच्या उमेदवारीबाबत मोठा निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
लाडकी बहीण सन्मान सोहळा व महायुती कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असून शक्तिप्रदर्शन करत, मा. खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीबाबत मोठा निर्णय जाहीर घोषणा करणार आहेत. तरी या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयकुमार शिंदे यांनी केले आहे.